प्रदीपराव पाटील  : भीमानगर प्रतिनिधी

वन विभागाच्या सतर्कतेमुळे
नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

भिमानगर-रांझणी परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्यांचा वावर दिसून आलेला असून मागील दोन दिवसांपूर्वी बिबट्या या परिसरात दिसून आला अशी माहिती मिळाली.

सविस्तर वृत्तांत असा की भिमानगर-रांझणी परिसर बागायती भाग असून 42 वर्षापासून उजनी धरण असून पश्चिमेला भीमा नदीचे विशाल पात्र असल्यामुळे या भागातील हजारो एकर क्षेत्रात ऊस केळी डाळिंब द्राक्ष आंबा पेरू आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे ,यामुळे गावात जुनी घरे किंवा जागा असली तरी 90% शेतकरी आपापल्या शेतात घरे बांधून राहत आहेत.सोमवारी राजू अरूण गोरे या युवकाला शेतात जात असताना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वेताळ जाधव यांच्या शेतात पुणे सोलापूर हायवे लगत हॉटेल गारवा शेजारी बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याचे राजू गोरे या युवकाने सांगितले असता शहानिशा केली असता बिबट्याचे माघ(पाऊल खुणा) दिसून आल्या परंतू वनविभागाच्या वतीने ठसे तपासले असता तरस या प्राण्यांचे आहेत असे वनकर्मचारी मल्हारी भानवसे यांनी सांगितले.

पञकार प्रदीप पाटील यांनी सोलापूर येथील मुख्य वन अधिकारी धेर्यशिल पाटील यांना व मोहोळ येथील उपवन अधिकारी उटगे व कुले॔ यांना संपर्क साधला असता त्यांनी मल्हारी भानवसे वन कर्मचारी यांना पाठवून माघ तपासणी केली असता सदर पाऊल खुणा या तरसाच्या ही असू शकतात परंतू नागरिकांनी सावध रहावे असे भानवसे यांनी सांगितले

या सद्य परिस्थितीमुळे मागील तीन-चार वर्षांपासून वन्य प्राण्यांचा वावर माढा तालुक्यात सातत्याने दिसून येत आहे. मागील दहा दिवसांपूर्वी कान्हापुरी- घोटी रस्त्यालगत असलेल्या विष्णु शाहू भोसले यांच्या वस्तीवरील कुत्रा आणि एका म्हशीच्या रेडकाचा बिबट्याने फडशा पडला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *