इंदापूर येथे राधिका सेवा संस्था व नगरसेवक अनिकेत वाघ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सवामध्ये माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चिमुकल्यासह भन्नाट दांडिया नृत्य केल्याने उपस्थित महिला वर्ग व भाविक भक्ताच्या आनंद द्विगुणित झाला.

काल शनिवार (दि.१ ऑक्टोबर) रोजी राधिका सेवा संस्थेच्या वतीने नगरसेवक अनिकेत वाघ व पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवामध्ये माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हजेरी लावली. दत्तात्रय भरणे हे नेहमीच भरगच्च कार्यक्रमात गेले असता वयोवृद्ध माता-पिता, महिला वर्ग व लहान मुले ,तरुण वर्ग यांच्यामध्ये सहज मिसळून मनमोकळेपणाने संवाद करतात हे अनेक वेळा तालुका वासीयांनी यांनी पाहिले आहे. त्यांना पदाचा  गर्व किंवा अहंकार आहे ना श्रीमंतीचा बडेजाव, साधी राहणीमान उच्च विचारसरणी याच पद्धतीने ते जीवन जगतात व समाजकारण करतात.ते नेहमी सांगतात माणसाच्या आयुष्यभर लक्षात राहावे असे पदावर असताना काम करावे त्या पद्धतीने त्यांची कृती असते. काल पण नवरात्र उत्सवात मिसळून लहान चिमुकल्यान सोबत भन्नाट दांडिया नृत्य केल्याने चिमुकल्याच्या आनंदाला सुद्धा परावर उरला नाही व त्यांचे मातापित्यांना देखील आनंद गगनात मावेनसा झाला.

नगरसेवक अनिकेत वाघ हे देखील आपले पिताजी अरविंद वाघ यांच्याप्रमाणे शहरातील नागरिकांसाठी मोठ-मोठे सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असतात. त्यांच्या या उपक्रमाची चर्चा संबंध तालुका भर होत असते. नवरात्र उत्सवाचा देखील त्यांनी कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केला आहे, या कार्यक्रमाला अनेकांनी आवर्जून हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाला येण्याचा मोह खुद्द आमदार व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील आवरता आला नाही .उत्कृष्ट नियोजन व तितकाच देखणा कार्यक्रम याचे तोंड भरून कौतुक माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले, व राधिका सेवा संस्थेची सर्व पदाधिकारी व नगरसेवक अनिकेत वाघ व  मित्रपरिवार यांना धन्यवाद देऊन पुढील कार्यास शुभेच्छा माजी राज्यमंत्री राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *