इंदापूर (दि.१२) : पुरवठा निरीक्षक संतोष अनगरे यांचयावर माहिती अधिकारातील माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने व अपील न घेतल्याच्या निषेधार्थ दलित महासंघ पदाधिकाऱ्यांसह स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करणार असल्याचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोळे यांनी लेखी निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की शासकीय धान्य वाहतूक ठेकेदार यांच्या अनागोंदी कारभार हा पुरवठा निरीक्षक संतोष अनगरे यांच्या आशीर्वादाने चालत असून याची माहिती आम्ही माहितीच्या अधिकारात मागवली होती परंतु माहिती न दिल्याने अपील केले परंतु त्याची सुनावणी घेतलेली नाही व पुरवठा निरीक्षक यांनी अपिलाचा काय खुलासा केला व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना काय अहवाल पाठवला हे आम्हाला माहीत नाही

निवेदनातील मागण्या खालील प्रमाणे

१) पुरवठा निरीक्षक यांचा अहवाल मिळावा

२) गोदाम पाल व हमाल ठेकेदार यांच्यावरील कारवाईची माहिती मिळावी

३) शासकीय धान्य वाहतूक ठेकेदार यांचा अहवाल मिळावा

४) माहिती अधिकारात मागवलेली माहिती मिळावी

या प्रमुख मागण्यासह स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी पत्र तहसीलदार यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही देण्यात आले आहे.

माहिती अधिकारात मागितली माहिती न देण्या पाठीमागचा उद्देश काय ? म्हणून आम्ही स्वातंत्र्य दिन उपोषण करीत आहोत असेही निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *