महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कोहिनूर हिरा म्हणजे श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब असं म्हणतात एखाद्या व्यक्तीच्या जन्मताच कपाळी संघर्ष लिहिलेला असतो असा संघर्ष माननीय साहेबांच्या वाट्याला अगदी जन्मापासून ते साठव्या वर्षाच्या प्रवासापर्यंत लिहिला गेलेला आहे .

खरंतर संघर्ष काय असतो हे साहेबांकडे पाहिल्यावर कळतं संघर्षातून, कष्टातून, स्वतःच्या नेतृत्वगुणावर मोठे झालेले नेतृत्व म्हणजेच साहेब ” शून्यातून विश्व निर्माण ” करण्याचे धाडस या नेतृत्वामध्ये आहे .

तसं पाहिलं तर साहेबांचा राजकीय संघर्ष १९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून सुरू झाला , तो आज अखेरपर्यंत प्रचंड ताकतीने, मेहनतीने या महाराष्ट्राच्या राजकारणात उभे असलेले नेतृत्व म्हणजे साहेब .१९९५ ला काँग्रेस पक्षाने तिकीट दिले नाही तेव्हा त्या ‘संघर्षातून पेटून उठलेले वादळ’ आज तागायत शांत झालं नाही लागोपाठ तीन वेळा अपक्ष म्हणून निवडून येणे अन तिन्ही वेळा मंत्रिपद मिळवणे हे सोपे नसते परंतु मिळालेल्या ‘संधीच सोनं करणं’ व आपल्या इंदापूर तालुक्याचा चौफेर विकास करणं यासाठी अहोरात्र संघर्ष करणारे नेतृत्व म्हणजे साहेब..

खरं तर साहेब पाटील घराण्यामध्ये राजाश्रय घेऊन जन्माला आलेले , पण स्वकर्तृत्वाने मोठे झालेले नेतृत्व राजकारणाचे बाळकडू ज्यांना घरातूनच मिळालं ते म्हणजे कै. भाऊ, कै .वडील शहाजी बापू , मातोश्री रत्नप्रभादेवी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल व्यक्तिमत्व म्हणजे साहेब….

साहेबांचा राजकीय प्रवास १९८६ सालापासून शिवामृत दूध उत्पादक संघ संचालक पदी निवड ,१९८८ सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना संचालक, १९९२ बावडा नरसिंहपुर झेडपी मधून विजयी झाले ,१९९२ मध्ये पुणे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत बंडखोरी करून विजय मिळवला त्यातूनच इंदापूर तालुक्याचे युवा नेतृत्व म्हणून साहेबांकडे संपूर्ण पुणे जिल्हा व महाराष्ट्र पाहू लागला एक तरुण, तडफदार नेतृत्व , शांत, संयमी , अभ्यासू नेतृत्व म्हणून इंदापूरची जनता साहेबांकडे पाहू लागली. अन १९९५ ची इंदापूर ची जागा साहेबांनी लढवावी अशी अपेक्षा लोकांनी मोठ्या भाऊंकडे केली परंतु काँग्रेस पक्षाने साहेबांचे तिकीट नाकारले आणि सुरू झाला प्रवास संघर्षाचा म्हणूनच म्हणतो हे नेतृत्व संघर्षातून तयार झाले आहे. १९९५ च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास दहा हजार मतांनी साहेब विजयी झाले. आणि आपल्या नेतृत्व कौशल्याची चुणूक संपूर्ण महाराष्ट्राला दाखविली.

अपक्ष आमदाराचा नेता म्हणून साहेबांना १९९५ ला विधिमंडळामध्ये पहिलं पाऊल ठेवल्याबरोबर राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथविधी झाला. कृषी , जलसंधारण व फलोत्पादन ही खाती मिळाली . सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचा नेता म्हणून साहेबांची ओळख निर्माण झाली .१९९९ मध्ये श्री नारायणजी राणे साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कृषी, जलसंधारण व फलोत्पादन या खात्याचे मंत्री झाले. खरंतर या प्रत्येक वेळी साहेबांना संघर्ष करावाच लागला.

पुढे २००० च्या विधानसभा निवडणूक लागली माननीय साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आपण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायचे ते ठरवले, पण पुन्हा एकदा कार्यकर्ते म्हणाले साहेब आपण अपक्ष लढू शेवटी नेता किती मोठा असला तरी कार्यकर्त्याचा विचार करणारा नेता म्हणून साहेबांची ओळख निर्माण झाली, २६००० पेक्षा जास्त मतांनी त्यावेळी साहेब निवडून आले त्या वेळचे मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये मा साहेबांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली खरी पण ‘राजकारणापुढे कुणाचे काय चालत नाही’ हेच खरं पाचच दिवसांमध्ये साहेबांना राजीनामा द्यावा लागला…

आपल्याच शेजाऱ्यांनी घात केला होता , तरीसुद्धा साहेब खचले नाहीत , कारण हा नेता संघर्षातून तयार झालेल नेतृत्व होतं पुढील काही महिन्यांमध्ये पुन्हा एकदा राजकीय परिस्थिती बदलली व विलासराव देशमुख साहेबांचे सरकार अल्पमतामध्ये आले , सरकार धोक्यात आल्यानंतर सात अपक्षांसह हर्षवर्धन पाटील यांनी विलासराव देशमुख यांना मदत केली तेव्हापासून आजपर्यंत पाटील घराणे व लातूरचे देशमुख घराणे यांच्यामधील मैत्री चे रूपांतर घट्ट स्वरूपाच्या नात्यांमध्ये तयार झाले, साहेबांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून २००२ मध्ये पणन व रोजगार हमी मंत्री म्हणून शपथ घेतली खरंतर पुन्हा एकदा संघर्ष काय असतो याचे उदाहरण साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दाखवून दिले कारण त्यावेळी प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता रोजगार हमीची कामे महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली अनेक लोकांना रोजगार मिळाला.

सन २००३ मध्ये माननीय सुशील कुमार शिंदे साहेबांच्या काळात सुद्धा साहेब पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून पणन व रोजगार हमी खात्याचे मंत्री झाले .

पुढे २००४ च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली याही निवडणुकीमध्ये साहेबांनी अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतला, जवळपास २५ हजार मतांनी साहेब तिसऱ्या वेळी सुद्धा अपक्ष म्हणून निवडून आले व पुन्हा एकदा पणन, रोजगार महिला व बालकल्याण या खात्याचे मंत्री म्हणून कार्यभार पाहिला त्याचवेळी साहेबांनी संसदीय कार्यमंत्री ही जबाबदारी सुद्धा योग्यरीत्या पार पडली त्यामुळे त्यांना उत्कृष्ट संसदीय कार्यमंत्री म्हणून महामहीम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार मिळाला प्रचंड कष्ट, जिद्द, मेहनत, चिकाटी व प्रचंड आत्मविश्वास यातून तयार झालेल्या नेतृत्व म्हणजे साहेब … पुढील काळात अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सहकार व सांस्कृतिक खात्याचे मंत्री म्हणून माननीय साहेबांनी उत्तमरीत्या काम केले.

२०१४ सालची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि परत एकदा शेजाऱ्यांनीच पाठीत खंजीर खुपसला लोकसभेला साहेबांची मदत घेतली खरी पण विधानसभेला दगा दिला या पराभवातून सुद्धा साहेबांनी आपले काम थांबवले नाही जनतेसाठी अहोरात्र कष्ट करणारा नेता म्हणून साहेबांची ओळख आहे , कारण हे नेतृत्व संघर्षातून तयार झाले आहे. पुढे २०२४ मध्ये ज्यावेळी विधानसभा निवडणुका होईल त्यावेळी इंदापूरचा आमदार म्हणून श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील अशा शुभेच्छा साहेबांना वाढदिवसानिमित्त देतो . संघर्षयोद्धा श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब

शब्दांकन प्रा . रोहिदास भांगे (कनिष्ठ विभाग )कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर जिल्हा पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *