| इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक जुनियर कॉलेज शालेय व्यवस्थापन समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत इंदापूर प्रेस क्लबचे सचिव तसेच पत्रकार निलकंठ भोंग यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक आर.डी.चव्हाण यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष निलकंठ भोंग यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष अतुल मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मिसाळ, महादेव मिसाळ, उपमुख्याध्यापक एम.बी.भोंग, पर्यवेक्षक आय.यु.खान शिक्षक के.डी.भोंग,वाय.यु. आदलिंग उपस्थित होते.
या विद्यालयात पाचवी ते बारावी पर्यंत कला, विज्ञान तसेच व्यावसायिकस स्तरांतील शिक्षण घेतले जात असते . ,क्रीडा क्षेत्रात गावातील विद्यार्थ्यांनी दमदार
कामगिरी करावी, या शाळेसाठी मोठे मैदानही असून त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी भोंग यांनी सांगितले. त्याचबरोबर पालकांची खाजगी शाळांकडे असणारी ओढ लक्षात घेता श्री केतकेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातच दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय साधण्यासाठी भविष्यात भरीव काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *