
प्रकाश आरडे
इंदापूर : तालुक्यातील लाकडी गावात मागासवर्गीय महिला रूपाली शेखर काटे हिचा संशयित आरोपी राजेंद्र जराड (रा.उदमईवाडी तालुका इंदापूर) याने १० ऑक्टोबर रोजी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. या घटनेने इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील लाकडी गावात राहणारी मागासवर्गीय महिला १० ऑक्टोबर रोजी शोचास गेली असता, उदमईवाडी तालुका इंदापूर या शेजारील गावात राहणाऱ्या ओळखीच्या राजेंद्र जराड या मराठा समाजाच्या व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. घटनेची सविस्तर माहिती अशी की, संशयित राजेंद्र जराड या व्यक्तीचे मयत रूपाली शेखर काटे यांच्या लाकडी गावात नेहमी येणे जाणे असायचे, व त्यांची ओळख बऱ्यापैकी होती. त्यातच मयत रूपाली काटे हिचे व संशयित राजेंद्र जराड व त्याची पत्नी स्वाती जराड यांची गेल्याच आठवड्यात किरकोळ भांडण झाले होते,याचा राग मनात धरून संशयित राजेंद्र जराड यांनी मयत रूपाली चा १० ऑक्टोबर रोजी बाथरूमला गेली असता धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादीत पुढे असेही नमूद केले आहे की मयत रूपाली ही मागासवर्गीय मांग समाजाची असल्याचे संशयित आरोपी राजेंद्र जराड व स्वाती जराड यांना माहीत असताना देखील जातीय द्वेषातून ही हत्या केली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली व मयताचा व घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही केली.
संशयित आरोपीवर भादवि कलम ३०२, व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये( ॲट्रॉसिटी अंतर्गत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे पुणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
