दि. १३ ऑक्टोबर

कोरोना काळानंतर प्रथमच महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मीयांचे सण उत्सव मोठ्या धुमधडाक्यात होत असून अतिशय उत्साही वातावरणात याचा आनंद सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे इंदापूर तालुक्याती भरणेवाडी येथील श्री. बिरोबा यात्रेनिमित्त समस्त धनगर बहुजन समाजाचे दैवत श्री. बिरोबा देवाचे दर्शन राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतले तसेच त्यांनी यावेळी बिरोबाला साकडे घालून सर्वांचे चांगले व्हावे यासाठीची प्रार्थना केली.

बिरोबा देवाचे दर्शन घेऊन, कपाळी भंडारा लावून , बिरोबाच्या नावाचं चांगभलं म्हणत राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बिरोबा देवाला सर्वांचे चांगले होवो यासाठी साकडे घातले. भरणेवाडी येथील ग्रामस्थांनी यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना काठी आणि घोंगडे देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
कोरोना कालावधीनंतरच्या या यात्रेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
