इंदापूर : शहरात समाजसेवेत कार्यरत असणाऱ्या रेश्मा शेख यांना ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन च्या वतीने नागपुर येथे वर्धापन दिनाचे औचित्य साधून फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. मनीषा ठाकरे यांच्या हस्ते भारतीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यभरातुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संपूर्ण देश व परदेशातील फाउंडेशनचे सभासद, पदाधिकारी व प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
रेश्मा शेख या गेल्या दहा वर्षापासून शहरात व तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषतः अल्पवयीन मुले मुली व महिला यांच्या संबंधित असणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी त्या हातोहात निपटारा करतात. त्या सध्या इंदापूर पोलीस स्टेशनच्या दक्षता कमिटीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) शहराध्यक्ष पदाची धुरा देखील पक्षाने त्यांच्या खांद्यावर सोपविले आहे.
ग्लोबल इंटरनॅशनल च्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनीषा ठाकरे यांनी रेश्मा शेख यांच्या समाज कार्यातील उल्लेखनीय कामगिरी बाबत त्यांना समाजसेवेतील मानद डॉक्टरेट पुरस्कार यापूर्वीच एका शाही समारंभात दिला आहे. १७ डिसेंबर रोजी ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनीषा ठाकरे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर रेश्मा शेख यांना भारतीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन ही टीम आंतरराष्ट्रीय अॅक्ट अंतर्गत रजिस्टर भारत सरकार मान्यता प्राप्त नीती आयोग प्राप्त आयएसओ संस्था आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात याच्या शाखा आहेत. चार लाखाहून अधिक सदस्य या शाखेचे सामाजिक कार्य करत आहेत ,आणि हे कार्य समाज परिवर्तन करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. मानव अधिकार,अँटी करप्शन कंजूमर प्रोटेक्शन, चिल्ड्रन अँड वूमन वेल्फेअर सोशल जस्टिस, व्हिलेजर्स ब्लाइंड सोल्जर अशा अनेक २३ रजिस्टर आहेत भारताबरोबरच आणखीन काही देशांमध्ये या संस्था कार्य करत आहेत.
रेश्मा शेख यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारतीय रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल स्वराज्य न्युज तर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा
.
