दि. २२ ऑक्टोबर

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून नागरिकांना अन्नधान्याचे किटचे वाटप राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते श्रीराम सोसायटी येथील राधाकृष्ण महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या वतीने करण्यात आले .
किटमध्ये एक किलो प्रमाणे डाळ ,साखर , रवा आणि एक लिटर तेल पिशवी यांचा यामध्ये समावेश आहे.
शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असून नागरिकांना याचा लाभ होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक गोरख शिंदे,नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद, आरपीआयचे संदिपान कडवळे,रघुनाथ राऊत , दादा पिसे अभिजीत अवघडे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *