इंदापूर : हिंगणगाव या.इंदापुर येथील पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकी आणि चार चाकी चा अपघात झाला या अपघातानंतर चारचाकी चालक वाहनाचा पळून जात असताना टायर फुटला यावेळी वाहनांमध्ये चंदनाची तस्करी होत असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित वाहन चालकास इतर साथीदारांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

या प्रकरणात तब्बल सहा लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशाल बळीराम गोडगे पोलीस शिपाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी ( ता .२०) रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान हिंगणगाव हद्दीत पुणे सोलापूर हायवे वर रमेश बाबुराव करडे (या.कलानगर,दापोडी पुणे ) यांनी त्याच्याकडे चंदनाची झाडे तोडण्याचा परवाना नसताना चंदनाच्या झाडाची चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचे लहान लहान तुकडे करून ते तीन पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये भरून त्याच्याकडील काळया रंगाच्या चार चाकी स्कार्पिओ मध्ये (क्रमांक एम एच १४ ए एम ७१८५) घेऊन जात होता अपघातानंतर पोलीस पकडतील म्हणून सदरचे वाहन जागीच सोडून तो इतर साथीदारांसह पळून गेला.

यावेळी ८७ किलो वजनाचे चार लाख ३५ हजार रुपये किमतीचे तीन पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये असलेले चंदनाच्या लाकडाचे लहान लहान तुकडे एक काळया रंगाची स्कार्पिओ, एक वन प्लस कंपनीचा मोबाईल असा एकुण सहा लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी रमेश करडे व त्याच्या इतर साथीदाराविरुद्ध पुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सलमान खान करत आहेत

 

अपघातामुळे उघड झाली चंदनाची तस्करी 

 

पळसदेव तालुका इंदापूर येथील संजय तुकाराम काळे हे पत्नी संगीता संजय काळे यांच्यासह दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या स्कार्पिओ मोटारीने हिंगणगाव हद्दीन पुणे सोलापूर हायवे रस्त्यावर बाभुळगाव पाटीजवळ पाठीमागून भरधाव वेगात येत जोरात धडक दिली यामध्ये काळे पती-पत्नी गंभीर जखमी झाले या पकरणी इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला

आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *