दि. १२ नोव्हेंबर

इंदापूर : प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने  दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय शासनाच्या या निर्णयाचे स्वागत संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून केले. गेली 25 वर्ष दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी लढणारे, दिव्यांगाचा आधारस्तंभ,माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रयत्नाला अखेर यश येऊन दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतल्यामुळे दिव्यांगांचा आनंद गगनात मावेनासा  झाला.  या निर्णयाचे स्वागत त्यांनी हलगीच्या निनादात पेढे व मिठाई वाटून आनंद साजरा केला व राज्य सरकारने या घेतलेल्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. यावेळी संघटनेचे अनेक महिला व पुरूष पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पदाधिकारी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आमचा आधारवड नेते बच्चूभाऊ कडू यांनी आमच्यासाठी गेली 25 वर्ष स्वतंत्र मंत्रालय असावे यासाठी शासन स्तरावर केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले व शिंदे सरकारने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे आम्ही समाधानी आहोत. म्हणूनच या निर्णयाचे स्वागत मिठाई व पेढे वाटून करीत आहोत . या निर्णयामुळे दिव्यग बांधवांची  मंत्रलय स्तरावरील कामे लवकर होतील. होणारा मनस्ताप कमी होईल. हक्काचे मंत्रलय होणार यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार.

यावेळी बाबासाहेब पाडुळे (जिल्हा उपाध्यक्ष), आनंदराव गायकवाड (ता.उपाध्यक्ष), रामदास चव्हाण (ता.सचिव), नाना सावंत(ता. कार्याअध्यक्ष ), दिपालीताई वाघमोडे (ता.म. अध्यक्ष), रत्नमाला पाडुळे (ता.म. उपाध्यक्ष), सचिन सुर्यवंशी (शहराध्यक्ष), सौरभ आगलावे, दादा पाटोळे, रहिम शेख, तुषार शेंडे, माधुरी परदेशी, सुरेखा सुपेकर, सिंधुताई लोखंडे, राजेश ढेरे, पांडुरंग गायकवाड, भारत शेंडे, संजय तुपे, बाळु सावंत, किसन भांगे, दिपक खराडे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *