साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश भाऊ कसबे यांची निवड

 

 

इंदापुर : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या इंदापूर शहर अध्यक्षपदी आकाश भाऊ कसबे यांची इंदापूर शहर सकल मातंग समाजाच्या वतीने सर्वानुमते निवड करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणेच शहर व तालुक्यात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय उत्साहात संपन्न होत असते. यंदाही अनेक सामाजिक उपक्रमाने जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे यासाठी सर्व तालुकास्तरीय उत्सव कमिटी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत आहे.

शहरात यंदाही २०२५ साठी पदाधिकारी नियुक्ती नुकतीच पार पडली यामध्ये

१) आकाश भाऊ कसबे : अध्यक्ष

२) संजय उत्तम सानप. : उपाध्यक्ष

३) अजय दिलीप सोनवणे : खजिनदार

४) बाळा राजू सागर. : कार्याध्यक्ष

५) सागर राजू सोनवणे. : सचिव

 

अशा पद्धतीची कार्यकारणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली.