
दि. १५ जानेवारी
इंदापूर : आज इंदापूर शहरातील शाहू नगर भागामध्ये ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार मा दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या विकासकामांमध्ये प्रभागातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज करणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. इंदापूर शहरातील नागरिकांना चांगल्या सुख सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही नेहमीच आग्रही असतो असे प्रतिपादन दत्तात्रय भरणे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इंदापूर शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
यापूर्वी इंदापूर शहरामध्ये जवळपास सर्व ठिकाणी रस्ते व ड्रेनेज कामे पूर्णत्वास आली आहेत त्याच बरोबर शहराचे प्रत्येक चौकात सुशोभीकरण करण्यात आल्यामुळे आपल्या शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे…आज महत्त्वाचे आशा तहसीलदार इमारत असेल नगरपालिका इमारत असेल किंवा नवीन कोर्ट इमारत असेल किंवा आय टी आय कॉलेज ची इमारत असेल अशा सर्व नवीन इमारतींमुळे शहराला एक वेगळे रुप प्राप्त झाले आहे.
आज संक्रांतीच्या सणानिमित्त महिला भगिनींना तिळगुळाचे वाटप यावेळी आमदार दत्तात्रय भरणे व प्रदीप गारटकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले…या वेळी भूमिपूजन समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे नगरसेवक ,पोपट शिंदे ,अनिकेत वाघ ,राजेश शिंदे, श्रीधर बाब्रस, अनिल राऊत ,सौरभ शिंदे,यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Post Views: 556
