दि. ३१ जानेवारी
 इंदापूर( प्रतिनिधी ) :  ग्राम विकास प्रतिष्ठान अवसरी  तसेच शिंगटे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने अवसरी गावांमध्ये प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
    या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच हनुमानाच्या प्रतिमांचे पूजन करून केले. या कार्यक्रमासाठी श्री हनुमान विद्यालय अवसरीचे अध्यक्ष श्री अरुण दादा शिंगटे, हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट अभिनेते शिवकुमार गुणवरे उपस्थित होते. तसेच मकर संक्रांति निमित्त महिलांसाठी तिळगुळ घ्या गोड गोड बोला या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मार्गदर्शिका सौ शिंगटे मॅडम यांनी केले,  तिळगुळ कार्यक्रमासाठी अवसरी मधून महिलांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला यावेळी जवळजवळ शंभर महिला उपस्थित राहून त्यांनी पारंपारिक संस्कृतीचे जतन करून उखाणे घेणे तसेच पारंपरिक गीते सादर करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला .
    तसेच रक्तदान शिबिरासाठी डॉक्टर धिरज शिंगटे यांनी अवसरीतील तरुण वर्गाला रक्तदानाचे महत्त्व सांगून मोठ्या संख्येने रक्तदान घडवून आणले . यावेळी अवसरी हायस्कूलमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर रक्तपेढी सोलापूर यांचे मोलाचे सहकार्य झाले. त्यावेळी या कार्यक्रमासाठी कर्मयोगी  साखर कारखान्याचे संचालक शिंदे पाटील तसेच भांडगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक शिंगटे मेडिकलचे मालक अमित शिंगटे तसेच हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक लोंढे सर तसेच डॉक्टर नागनाथ शिंदे, बुधावले सिस्टर, सिद्धेश्वर रक्तपेढी सोलापूर चे डॉक्टर समाधान सरडे, गलियाल एच .के. प्रियंका घंटे, वैष्णवी गड्डम, अजय जाधव ,रोहित  बगले, सचिन कोणचे तसेच अवसरी गावातील प्रतिष्ठित तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी कष्ट घेतले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घळके सर, यांनी केले, अनुमोदन श्री गवळी सर यांनी दिले, तर आभार प्रदर्शन श्री रसाळ सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *