दि. ०२ जानेवारी
इंदापूर : आज (दि.०२) रोजी समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्था व समीक्षा ब्युटी पार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व मुलींसाठी खास घरबसल्या कोर्सेसची सुरुवात एडवोकेट रेशमा गार्डे यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून  करण्यात आली यावेळी अनेक महिला व मुली उपस्थित होत्या.
शहरामध्ये व खेड्यामध्ये महिला व मुलींसाठी ग्रह व्यवसाय व स्वावलंबी होण्यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत परंतु भरमसाठ पैसे भरून हे कोर्सेस करणे  आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या महिला व मुलींना करता येत नाही हीच अडचण लक्षात घेऊन समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्थेचे सर्वेसर्वा सौ रोहिणी राऊत यांनी खास अल्प दरात हे कोर्स उपलब्ध करून दिल्याने महिला व मुलींमध्ये आनंदी व चैतन्याचे वातावरण आहे.
महिला व मुलींना स्वावलंबी व्हावे असे वाटत असते, परंतु त्यांचे स्वप्न  अपूर्ण राहते व त्यांचा भविष्यात अपेक्षाभंग होतो.त्यांच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळत नाही .इंदापूर शहरांमध्ये अशा होतकरू व गरीब महिला व मुलींसाठी सौ रोहिणी राऊत यांनी खास अल्प दरात ब्युटी पार्लर, शिलाई मशीन क्लास, मेहंदी क्लास बाजारभावानुसार 50% सवलतीच्या दरात उपलब्ध केले आहेत. याची सुरुवात आज पासून करण्यात आली तरी गरीब व गरजू महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ रोहिणी राऊत यांनी केले आहे.
यावेळी एडवोकेट रेश्मा गार्डे यांच्यासह महिला दक्षता समितीच्या सदस्या रेश्मा शेख, निर्मला जाधव व विजया मस्के, पल्लवी भोसले,सौ. हंसा रमेश परमार या उपस्थित होत्या. मुलींमध्ये निकिता ठोकळे, प्रतीक्षा बगाडे, मनीषा पवार, सोनाली ढेबे व अनेक मुली उपस्थित होत्या.
संस्थेचा पत्ता : आय कॉलेजच्या पाठीमागे पाणी फिल्टर प्लांट शेजारी सोनाई नगर.
मो. नं. ७४९८२९३११९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *