दि. १५ फेब्रुवारी

इंदापूर : प्रसिद्ध हलगी सम्राट विठ्ठल (आण्णा) मोरे यांच्या मातोश्री तुळसाबाई लक्ष्मण मोरे यांचे काल (दि १४ फेब्रुवारी) निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्ष होते.त्यांच्या पश्चात ४ मुले १ विवाहित मुलगी सुना, नातवंडे असे एकूण ७५ जणांचे कुटुंब आहे.
कै. तुळसाबाई मोरे या अतिशय प्रेमळ व बोलक्या स्वभावाच्या म्हणून पंचक्रोशीत परिचित होत्या. भेटलेल्या प्रत्येक माणसाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे जिव्हाळ्याने व आपुलकीने विचारपूस केल्याने समोरच्या माणसाला त्यांच्याविषयी आदर व जिव्हाळा वाटायचा.वयाची नव्वदी पार करून देखील त्यांच्यामध्ये जबरदस्त सकारात्मक ऊर्जा होती.
हलगी सम्राट विठ्ठल मोरे यांना या मातेने खंबीर साथ व संस्कार दिल्याने हालाखीच्या परिस्थितीमुळे जरी शिक्षण घेता आले नाही तरी मुलाच्या आवडीचा हलगी वाजवण्याचा छंद जोपासला, व हाच छंद अतिउच्च शिखरापर्यंत पोहोचविण्यासाठी सतत धडपड केली, व आज संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशांमध्ये विठ्ठल अण्णा मोरे म्हणजे जगप्रसिद्ध हलगी सम्राट म्हणून मोरे कुटुंबीयांचे नाव उज्वल केले. अशा या प्रेमळ मातेचे निधन झाल्यामुळे पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अंत्यविधीला समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली व मोरे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
…….. स्वराज्य न्युज तर्फे कै.तुळसाबाई मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ….
