इंदापूर : ( दि. १७ फेब्रुवारी)  शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे  क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांची  १४२ वी पुण्यतिथी  मातंग एकता आंदोलन व लहुजी शक्ती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. 
 _यावेळी इंदापूर नगरपरिषदचे मा.नगरसेवक, दादासाहेब सोनवणे व  दत्ताभाऊ जगताप (पुणे जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना) यांच्या हस्ते क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्ध कले मध्ये लहुजी निपुण होते लहुजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रां बरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असतं. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले. 
२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे
इ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.
यावेळी दिलीपराव शिंदे,सचिन जामदार,राहुल जौंजाळ,आनसार शेख,_ 
 _संतोष धोत्रे,अरविंद ढावरे,धनंजय खंडाळे,ज्ञानेश्वर सोनवणे,नंदु खंडाळे,अक्षय काळे,सुरज कोळी,दादा गवळी, ऋषिकेश ढावरे, रुपेश कांबळे , पत्रकार प्रकाश आरडे  व समाज बांधव उपस्थित होते. 
 या कार्यक्रमाचे नियोजन मातंग एकता आंदोलन  संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.ललेंद्र शिंदे यांनी केले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *