दि. १८ फेब्रुवारी

कर्मयोगी व इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय शंकरराव पाटील यांची ९९ वी जयंती इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. यावेळी इंदापूर मार्केट कमिटी आवारातील शंकरराव पाटील यांच्या पुतळ्याला काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्ष निवास शेळके यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

 

कार्यक्रमासाठी इंदापुर तालुका उपाध्यक्ष निवास शेळके यांच्यासह पुणे जिल्हा सरचिटणीस बिभीषण लोखंडे, किसान सेल अध्यक्ष डॉ. संतोष होगले, सचिव महादेव लोंढे, शहर अध्यक्ष रमजान बागवान, जेष्ठ नेते जाकीर काझी, समीर शेख, शिवाजी आहेर, संदीप शिंदे व सुफींया जमादार हे मान्यवर उपस्थित होतो. यावेळी उपस्थितांनी कर्मयोगी भाऊंच्या आठवणींना व कार्याला आपलाल्या आठवणीतून उजाळा दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *