दि. ०२ मार्च

इंदापूर : गुरूवार (दि.२) रोजी सावित्रीबाई फुले मोफत वाचनालयातर्फे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला व महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
इंदापुरात सावित्रीबाई फुले मोफत सार्वजनिक वाचनालय तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अनेक महिला उपस्थित होत्या. २७ फेब्रुवारी रोजी काही तांत्रिक कारणामुळे हा कार्यक्रम घेता आला नव्हता त्यामुळे काल (दि.२ मार्च) रोजी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी १९ जानेवारी व २१ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा व हस्ताक्षर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला.

यावेळी मायाताई विंचू (माजी नगराध्यक्ष), रेश्मा शेख (दक्षता समिती सदस्या,प्रदेश सचिव मानव विकास परिषद), प्रा.जयश्री गटकुळ (जिल्हा अध्यक्ष लिनेस क्लब), उज्वला गायकवाड (जिल्हा सचिव), कल्पना भोर (तालुकाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड) , सुनंदा अरगडे (इंदापूर सचिव),अर्चना शिंदे (खजिनदार ), निर्मला जाधव(दक्षता समिती सदस्या) उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभा दाणी (अध्यक्षा सावित्रीबाई फुले मोफत वाचनालय), नंदा मोकाटे (सचिव), माधवी सोननीस (सदस्य),मंगल ढोले (सदस्य), राजश्री देशपांडे (ग्रंथपाल), निर्मला शिंदे, वंदना अडागळे (शिपाई) यांनी परिश्रम घेतले.
