
दि. ०६ मार्च
इंदापूर: इंदापूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैद्य व्यावसायिक, गुन्हेगार यांनी चांगलाच धसका घेतल्याचे पाहावयास मिळते. अशाच खमक्या व कर्तव्याशी प्रामाणिक असणाऱ्या अधिकाऱ्याची गरजच होती.
माळवाडी नं. १ ता इंदापूर येथील अशोक अंकुश व्यवहारे यांनी आपल्या घरातील साडे सतरा तोळे सोने चोरी झाल्याची फिर्याद दिली व ताबडतोब चार तासात आरोपींना जेरबंद करण्यात इंदापूर पोलिसांना यश आले
दोनच दिवसापूर्वी अफूची शेती करणारेंचा सुगावा लागताच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्याच नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात अवैधरित्या हजारो किलोमीटरहून आलेला व इंदापूरातुन चार चाकी मधुन जाणारा गांजा अरोपीसह पकडला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अशोक अंकुश व्यवहारे वय ४३ ( रा.क्षिरसागरवस्ती माळवाडी नंबर १ ता.इंदापुर) यांनी या बाबत गुन्हा दाखल केला होता. आपल्या राहत्या घरातील साडे सतरा तोळे सोन्याचे दागिणे कोणीतरी चोरून नेले आहेत अशी फिर्याद इंदापूर पोलीस स्टेशनला त्यांनी दिली होती.सदर घटनेचे गांभिर्य ओळखून इंदापुर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सखोल तपास व शोध पथकांना सदर गुन्हयाचा तपास करण्याबाबत मार्गदर्शन केले.त्यानुसार गुन्हे शोध पथकाने पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सुचनेप्रमाणे वेगवेगळे तर्क-वितर्क वापरून व तांत्रीक विश्लेषण करून सखोल तपास केला.
आणि अखेर पोलीस पथकाला हा गुन्हा कोणी केला हे शोधण्यास यश मिळाले. सदरची संपूर्ण तपासणी झाल्यानंतर सदर गुन्हयात दोन आरोपी पकडण्यात आले. १) सागर अरुण राउत वय २० वर्षे, रा.टेंभुर्णी कोष्टी गल्ली ता.इंदापुर, २) दादा बळी शेंडगे वय २१ रा.साठेनगर ता.इंदापुर जि.पुणे यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आणि त्यांचे कडुन सदर गुन्हयातील चोरीला गेलेले तब्बल ८,७५,००० रुपये किंमतीचे साडे सतरा तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत करुन चोरीचा गुन्हा ४ तासात उघडकीस आणला.
इंदापुर पोलीस ठाणे येथे गु र नं २९८/२०२३ भादवि कलम ४५४,४५७,३८० नुसार आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. मा.न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी रिमांड दिले आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे षोध पथक प्रमुख सहा.पोलिस निरीक्षक पवार हे करित आहेत. सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामिण .अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार,पोलीस हवालदार प्रकाश माने,पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव,पोलीस नाईक सलमान खान पोलीस नाईक लखन साळवे पोलीस अंमलदार नंदु जाधव, विनोद लोंखंडे ,लक्ष्मण सूर्यवंशी व महीला पो हवा खंडागळे या पथकाने केली आहेे.
