दि. १६ मार्च

  इंदापूर : इंदापूर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ह. राजाबागसवार (रह.) दर्गाह यांचा उरुस सुरु आहे.आज निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी ह. राजाबागसवार (रह.) यांच्या दर्ग्यावरती चादर चढवून दर्शन घेतले.

  सर्वत्र सुख, शांती, आनंद व भरभराटीचे वातावरण निर्माण व्हावे अशी प्रार्थना यावेळी राजवर्धन पाटील यांनी केली.

   उत्साहपूर्ण वातावरणात नागरिकांनी दर्ग्याचे दर्शन घेत परिसरामध्ये आनंदी वातावरण निर्माण केले होते.

    यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *