दि. ३० मार्च

 

इंदापूर : बुधवार (दि.२९) रोजी रात्री च्या वेळी अकलूज – इंदापूर मार्गे पिकअप जीपमधून अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती खबर्यामार्फत पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली पिकअप चारचाकी गाडी कर्नाटक हून अकलूज-इंदापूर मार्गे पुण्याच्या दिशेने निघाली होती. त्यानुसार इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पेट्रोल पंप या ठिकाणी ही कारवाई केली. कारवाई वेळी प्रकाश कुशान हेगरे (वय २६, रा. कोकटनूर, ता. अथनी, जि. बेळगाव) व मल्लू जयश्री मेलगडे (वय १८, रा. अर्जुनगी, ता. बबलेश्वर, जिल्हा, विजापूर) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भा. द. वी कलम ३२८,१८८, ३४ यांसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

सदर कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पो. ह सुनील बालगुडे,पो. शि. विकास राखुंडे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि नागनाथ पाटील करीत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *