दि. १४ एप्रिल

 

बाबासाहेबांनी आपणाला शिका,संघटित व्हा, संघर्ष करा, हा आपल्या व समाजाच्या उन्नतीसाठी मंत्र दिला खरा पण आज आपण याप्रमाणे वागतोय का हा खरा प्रश्न आहे. आपण सुशिक्षित झालो आणि आपण संघटित होण्यापेक्षा संघर्ष करीत राहिलो बर हा संघर्ष कोणत्या व्यवस्थेबरोबर करायच हा खरा प्रश्न आहे. असे परखड मत रेश्मा शेख प्रदेश सचिव मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी अभिवादन करताना काढले. 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे करोडो वंचित बहुजन वर्गातील माणसांना त्यांचे हक्क मिळवून देणारे महामानव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतरत्न, बोधिसत्व, कैवारी ,शिल्पकार, महामानव, विश्वरत्न ,महाकारूणीक, कायदे पंडित, घटनाकार, क्रांतीसुर्य, ज्ञानज्योती, विधिवेतता, अर्थशास्त्री, राजनीतिज्ञ, लेखक,समाजशास्त्री, मूकनायक, युगपुरुष अशा नानाविध उपाधीने ओळखले जात असेही त्या म्हणाल्या. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व भिमसैनीक व अनुयायांना त्यांनी शुभेच्छा दिल्या

रेश्मा शेख यांच्याबरोबर मानव विकास परिषदेचे अनेक पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नगरपालिकेसमोरील आंबेडकर पुतळा व आंबेडकर नगर येथील जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी उपस्थित होते. 

यावेळी विद्या सरोदे(तालुका संपर्कप्रमुख),मनीषा भांगे (तालुका उपाध्यक्ष),निलोफर पठाण (जिल्हा उपाध्यक्ष),माधवी सोननिस( तालुका अध्यक्ष),महिपत (तात्या) कदम (जिल्हा सचिव),एडवोकेट रेश्मा गार्डे (कायदेशीर सल्लागार), निर्मला जाधव (पुणे जिल्हाध्यक्ष, ग्रामीण) उपस्थित होते. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *