दि. १५ एप्रिल

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. अनेक मोठ-मोठ्या संस्था काढून त्या संस्थांच्या जिवावर आपले राजकारण करू पाहणारे अनेक राजकारणी सध्या महाराष्ट्रात दिसतील.मात्र अलीकडच्या काळात केवळ सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर राजकारणात यशस्वी होणारे आमदार दत्तात्रय भरणे कदाचित एकमेव राजकारणी असतील.त्यामुळे आमदार भरणे यांच्या राजकारणाची पध्दत ही आजच्या घाणेरड्या राजकारणाला झणझणीत अंजन झालण्यासारखी आहे.

श्री.भरणे यांचा स्वभाव, राजकारणाची पध्दत आणि त्यांचा साधेपणा हा अगदी लहान मुलांपासून ते अबाल वृध्दांपर्यंत सर्वांनाच भावतो आहे.साधारण पणे नव्वदच्या दशकापासून आमदार भरणे हे राजकारणात सक्रीय आहेत.तेव्हा पासून ते आजतागायतपणे त्यांनी सामान्य माणसाची नाळ तूटू दिली नाही.विविध संस्थावर काम करत असताना आलेल्या प्रत्येक माणसाचे काम मार्गी लागून त्याला आपल्याकडे आल्याचे समाधान वाटले पाहीजे,हा कटाक्ष आमदार भरणे यांनी कायम पाळल्याने आज त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे विणले आहे.केवळ राजकारणासाठी राजकारण न करता

प्रत्येकाच्या सुख-दु:खात आमदार भरणे धाऊन जात असल्याने त्यांचे तालुक्यातील प्रत्येक कुटूंबाशी आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.त्यामुळे अगदी गाव पातळीवरचा साधा कार्यकर्ताही त्यांना थेट संपर्कात असतो.मंत्री असताना किंवा आता आमदार असताना सुद्धा कोणताही बडेजावपणा न करता ते कधी जत्रेच्या पंगतीला जेवताना दिसतील,कधी लहान मुलांसोबत खेळताना दिसतील तर कधी शाळेच्या स्नेह संमेलनात शालेय विद्यार्थ्यांच्या बरोबर नृत्य करताना दिसतील,तर कधी कार्यकर्त्यांच्या मोटार सायकलवर फेरफटका मारताना दिसतील.त्यांच्या याच साधेपणामुळे आमदार भरणे यांनी जनतेच्या हृदयामध्ये विशेष स्थान प्राप्त केले असून असंख्य गोरगरिब कार्यकर्ते त्यांच्यावर जिवापाड निस्सीम प्रेम करतात. 

याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पडस्थळ गावामध्ये आला आहे.याचे झालं असं की २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार दत्तात्रय भरणे यांना विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेते बाहेर पडले होते.त्यामुळे दत्तात्रय भरणे एकटे पडले होते.परंतु सामान्य कार्यकर्ता आणि गाव-गावातील गोरगरिब जनता मात्र दत्तात्रय भरणे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती.अशा संकटाच्या काळात आपल्या लाडक्या नेत्याला पुन्हा आमदार करण्यासाठी सामान्य कार्यकर्ते जीव ओतून लढत होते.तर गावा-गावातील वडीलधारी मंडळी आमदार भरणे सगळ्यांच्या नाकावर टिच्चून आमदार व्हावेत म्हणून नवस करत होती.

असाच नवस पडस्थळमधील रामभाऊ मारकड यांनी केला होता.

पडस्थळ गावातील श्री.कोटलिंगनाथ देवस्थान नवसाला पावणारे म्हणून उजनी बॅकवॉटर परिसरात परिचीत आहे.त्यामुळे आपला लाडका नेता पुन्हा आमदार व्हावा या भावनेने रामभाऊ मारकड यांनी श्री. कोटलिंगनाथ चरणी नवस केला होता.इकडे अनेक अडचणींवर मात करत दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला तर दुसरीकडे रामभाऊ मारकड यांच्या सारख्या अनेक सामान्य माणसांची श्रध्दा खरी ठरली होती‌.परंतु लागलीच कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्ष मंदिरे,यात्रा-उत्सवांवर निर्बंध असल्याने इच्छा असूनही रामभाऊ मारकड यांना नवस पुर्ण करता आला नाही.

परंतु यंदाच्या वर्षी त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना बोलावून त्यांच्या वजनाइतके म्हणजे तब्ब्ल ८९ किलोंची पेढेतुला करून अखेर नवस पुर्ण केला.यावेळी आमदार भरणे यांच्याबरोबर रामभाऊ मारकड,पांडूरंग मारकड,बापूआण्णा रेडके,विष्णू रेडके,संदिपान मारकड परशुराम रेडके,विलास मारकड,भारत मारकड,महेंद्र रेडके,अरूण झिटे,दत्ता रेडके,आरूण मारकड विशाल मारकड,हनुमंत रेडके,जितेंद्र मारकड,नवनाथ मारकड यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

एकूणच सामान्य कार्यकर्त्याच्या अशाप्रकारच्या प्रेमाने मात्र आमदार दत्तात्रय भरणे अतिशय भारावून गेले होते.यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावील निखळ हास्य नेता व कार्यकर्त्यामधील निस्सिम प्रेमाची साक्ष देत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *