दि. १६ एप्रिल

इंदापूर : कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे दिनांक १३ एप्रिल रोजी पारंपारिक दिन मोठ्या उत्साहात व आनंदात प्राचार्य जीवन सरवदे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागातून संपन्न झाला अशी माहिती इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक विद्या गायकवाड यांनी दिली

         या पारंपरिक दिन सोहळ्यात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले . भारतातील विविध प्रदेशातील पारंपारीक पोषाखात विद्यार्थी आले होते . पारंपारीकता आणि आधूनिकतेचा समन्वय ही काळाची गरज आहे . पारंपारीकता व नैतीक मुल्यांच्या अंगीकारा मुळे समाज पर्यायाने राष्ट्र नैतीक दृष्ट्या विकसीत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जिवन सरवदे तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. विद्या गायकवाड यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर , विज्ञान विभाग प्रमुख डॉ . शिवाजी विर , वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सदाशीव उंबरदंड यांनी विशेष परिश्रम घेतले . परिक्षक म्हणून डॉ . राजाराम गावडे डॉ. राजेंद्र साळूंखे , डॉ . गजानन ढोबळे , प्रा मनिषा गायकवाड यांनी काम पाहीले .

पारंपारिक दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. प्राचार्य जीवन सरवदे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार केला आणि कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील पारंपारीक दिन उत्साहात साजरा झाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *