दि. १८ एप्रिल

 

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले  यांचा आज वाढदिवस. माजी खासदार कर्मयोगी शंकररावजी पाटील तथा भाऊ यांच्या त्या कन्या.भाऊंनी अखेरच्या श्वासापर्यंत जसे इंदापूर तालुका  माझे घर व तालुक्यातील नागरिक हे त्या घरातील सदस्य समजून काम केले तीच शिकवण पद्माताई यांच्या अंगी  तंतोतंत आहे. 
 पद्माताईंनी नवीन व्यवसायाची संधी महिलांना मिळावी म्हणून ग्रोफेल गारमेंट व्यवसायात महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ यातून सायन्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज, सारथी कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता अभियान जावेद हबीब हेअर अँड ब्युटी अकॅडमी, या संस्थेमार्फत आर्थिक दुर्बल घटकातील ५००० महिलांना मोफत प्रशिक्षण.
ऊसतोड मजुरांची मुले शिकली पाहिजे यासाठी ताईंनी  कोपी वरची शाळा ही संकल्पना साक्षात राबवली. यामुळे ऊसतोड मजुरांची मुले गुण्यागोविंदाने त्या शाळेत शिकण्यासाठी दाखल झाली . त्यांना वेळेवर खाऊ,कपडे, मनोरंजनासाठी विविध प्रकारचे साहित्याबरोबरच गॅदरिंग सारखा उपक्रम राबविला यामुळे त्या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण झाली. 
ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची काळजी घेऊन महाराष्ट्रात सर्वप्रथम ऊसतोड मजुरांसाठी फिरता दवाखाना ही संकल्पना राबवली. 
तालुक्यातील महिलांना रोजगार तर मिळालाच पाहिजे परंतु त्या सक्षम झाल्या पाहिजेत म्हणून महिला सक्षमीकरणात तालुक्यात ट्रस्टचे काम खरोखरच नेत्र दीपक आहे. 
शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत आतापर्यंत १६००० सलग तीन वर्षात आरोग्य तपासणी केली व त्यांना मोफत औषधी दिली
ताईंनी इंदापूर तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शंकराव पाटील अक्षय शिक्षण योजना सुरू केली या योजनेमुळे विद्यार्थ्यांना गारमेंट मेकिंग कोर्स ड्युटी मेकअप आणि हेअर स्टाईल या प्रकारच्या स्किल्स कोर्सचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम संस्थेमार्फत केले
ताईंचे काम ऊसतोड मजूर,कामगार  विद्यार्थी मुली महिला यांच्यासाठी आहे म्हणूनच ताई म्हणजे सर्वांच्या साक्षात माईच आहेत. 
 इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सध्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत निवास व जेवणाची सोय करून त्यांना मुलाखती व नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जात आहे विद्यापीठाच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून दिला जातो. 
पद्माताई च्या या शैक्षणिक  कामाचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे अशा या ताईंना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. … 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *