दि. २९ एप्रिल

इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुक मतदान प्रक्रिया शूक्रवार दि.२८ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीमध्ये पार पडली. एकुण १८ जागा असुन त्यापैकी ४ जागा बिनविरोध झाल्या.तर उर्वरीत १४ जागांसाठी मतदान प्रक्रिया शुक्रवारी पार पडली.यामध्ये इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे,माजी सभापती दत्तात्रय फडतरे,माजी सभापती विलास माने, संचालक मधुकर भरणे,संग्रामसिंह निंबाळकर,अनिल बागल,आबा देवकाते,शिवाजीराव इजगुडे रोहित मोहळकर यांचेसह शिवसेना (शिंदे गट)इंदापूर तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील,आशोक घोगरे, उल्हास जाचक,तानाजिराव निंबाळकर,या मातब्बरांसह एकुण १४ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असुन शनिवार दि.२९ जुलै रोजी दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार असल्याने संपुर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुक निकालाकडे लागले आहे.

          १४ जागांसाठी ४ हजार ४३२ एकुण मतदान होते.यापैकी कृषि पतसंस्थेसाठी ३१३१ इतके मतदान होते.त्यापैकी २९९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व कृषि पतसंस्थेसाठी एकुण ९५.६९ टक्के इतके मतदान झाले.तर ग्रामपंचायत विभागात ११९१ इतके मतदान होते.त्यापैकी ११५८ मतदारांनी हक्क बजावला असुन ग्रामपंचायत मतदानाची टक्केवारी ह ९७.२३ टक्के इतकी आहे.तसेच एकुण ४३२२ मतदानापैकी ४१५४ मतदान झाले असुन दोन्ही विभागाची एकुन सरासरी मतदान टक्केवारी ही ९६.११ टक्के इतकी झाली आहे.
      कृषि पतसंस्था केंद्रनिहाय झालेले मतदान व त्याची टक्केवारी खालील प्रमाणे.१) इंदापूर मतदान ३१६ पैकी झाले ३०१, ९५.२५ %, २)वडापूरी ३८० पैकी ३६०,९४.७४%, ३) बावडा ४३६ पैकी ४१८,९५.८७%, ४)निमगाव केतकी २१७ पैकी २१०,९६.७७%, ५) शेळगाव २५२ पैकी २४८,९८.७७%,६) जंक्शन २३१ पैकी २३०,९९.५७%, ७) सणसर १९६ पैकी १९०.९६.९४% ८) कुरवली ३६० पैकी ३२७, ९०.८३%,पळसदेव ३६२ पैकी ३४७, ९५.६८%, १०) भिगवण ३८१ पैकी ३६५, ९५.८०% झाले आहे.तर ग्रामपंचायत विभागात इंदापूर १३४ पेकी १२९, ९६.२७%, २)वडापूरी १३१ पैकी १३०, ९९.२४%, ३) बावडा १६९ पैकी १६४,९७.०४%, ४) निमगाव केतकी ९६ पैकी ९२,९५.८३%, ५) शेळगाव १०५ पैकी १०५१००%, ६) जंक्शन १०० पैकी ९९,९९%, ७) सणसर ९६ पैकी ९२,९५.८३%, ८) कुरवली ८७ पैकी ८५,९७.७०%, ९) पळसदेव १२६ पैकी १२५,९९.२१%, १०) भिगवण १४७ पेकी १४२,९६.६०% असे मतदान झाले असुन शनिवार दि.२९ जुलै रोजी सकाळी ठीक ९ वाजता शिक्षक सहकारी तसंस्था सास्कृतिक भवन इंदापूर,शासकीय गोडाऊन शेजारी या ठीकाणी मतमोजनी होणार असुन साधारणत: दुपारी एक वाजेपर्यंत निकालाचे सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.तालुक्यातील मातब्बर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने या निवडणुक निकालाचा परिणाम आगामी जि.प.व पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा नावडणुकीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *