दि. १० मे

इंदापूर : इंदापूर शहरातील नामांकित फळांचे व्यापारी सादिक बागवान यांचा भाऊ महरूम इस्माईल बागवान यांची कन्या सदफबानू व वसीम साहब यांच्या शुभ मंगल विवाह प्रसंगी उपस्थित असलेले माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय (मामा) भरणे व मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत (तात्या) माने व अनेक पदाधिकारी उपस्थित राहिले.

यावेळी दोन्ही आमदारांचे स्वागत करण्यासाठी आयोजक व पदाधिकारी यांची धांदल उडाली यावेळी लहान मुले देखील उत्सुकतेपोटी दोन्ही आमदारांकडे पाहत असताना चाणाक्ष नजरेने माजी राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी त्या मुलांकडे पाहून त्या मुलांना जवळ घेऊन आस्थेने विचारपूस केली व मला ओळखले का ? मी कोण आहे ? असा प्रश्न विचारल्यानंतर ताबडतोब त्या लहान चिमुकल्यांनी दत्तात्रय (मामा) भरणे असे तत्परतेने उत्तर दिल्याने अनेकांनी त्या लहान मुलांचे कौतुक केले व दत्तात्रय मामा भरणे हे लहानग्यांपासून ज्येष्ठ, वृद्धांपर्यंत लोकप्रिय असल्याचा साक्षात्कार उपस्थितांना झाला. खरोखरच राजकीय सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना माणसांमध्ये मिसळल्याने माणसांमधील सुखदुःख जाणून घेतल्याने त्या माणसाला स्वतःची ओळख सांगण्याची कधीही गरज भासत नाही. समोरचे गरीब असो वा श्रीमंत असो त्यांच्या हृदयाच्या सिंहासनावर त्यांचे नाव कायमची कोरले जाते याचा प्रत्यय आजच्या या कृतीतून दिसून आला….

यावेळी माजी राज्यमंत्री, विद्यमान आमदार दत्तात्रय (मामा) भरणे, मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत (तात्या) माने ,सचिन सपकाळ, महादेव लोखंडे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या शुभमंगल विवाहप्रसंगी अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप (दादा) गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण भैय्या माने, इंदापूर नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, अनेक पत्रकार उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *