दि. १७ मे

महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर तालुका माळशिरस या विद्यालयातील १९९६/९७ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येत मुख्याध्यापक डी पी मुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विद्यार्थी स्नेह मेळावा अर्थात गेट टुगेदर साजरा करून त्या काळातील विद्यार्थी दशेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या स्नेह मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळातील विद्यार्थी देशात असणारे मुले – मुली आज वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीरित्या उच्च पदावर कार्यरत असून काही जण प्रगतशील बागायतदार तर काहीजण राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक व व्यापार या क्षेत्रात उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत.
सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रातील अनुभव तर सांगितलाच परंतु आपापल्या मुलांना देण्यात येणारे संस्कार व त्यांच्यात असणारे स्पर्धेच्या युगातील कलागुणांना कसा वाव मिळेल याबद्दल आपापल्या अनुभवानुसार वैचारिक देवाण-घेवाण केली. तब्बल २६ वर्षानंतर एकत्र आल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. काहींनी जुन्या आठवणी सांगत असताना भावनाविवश झाल्याचे पहावयास मिळाले. त्याकाळी असणरा गुरुजनांच्या प्रति आदर आज देखील तसाच प्रत्येकाच्या मनामध्ये असल्याचे पहावयास मिळाले.
या विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी सध्याचे मुख्याध्यापक संजय आजिनाथ गलितकर सर व मराठी विषयाचे माजी शिक्षक खुस्पे सर आवर्जून उपस्थित होते.
या विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन सीमा गायकवाड व निर्मला जाधव यांनी केले.
विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे औचित्य साधून सर्वांनी मिळून माजी मुख्याध्यापक मुळे सर यांचा ८० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व प्रत्येक विद्यार्थ्याचे जीवन प्रकाशमय व्हावे यासाठी शाळेला समई भेट देण्यात आली.
या विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या सांगता समारंभ सर्वांनी एकत्रित सुग्रास जेवणाचा मनमुनात आस्वाद घेऊन करण्यात आला.
