२६ मे

इंदापूर : उद्या शनिवार (दि.२७) रोजी शहा संस्कृतिक भवन इंदापूर येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग महाराष्ट्र, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंदापूर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे. शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार श्रीकांत पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी कापरे आर. सी. , पोलीस निरीक्षक दिलीप पवार, गटविकास अधिकारी परीट व्हि. डि. हे प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सदर शिबिराचा नुकतेच उत्तीर्ण झालेले दहावी व बारावीतील शालेय विद्यार्थ्यांना लाभ व्हावा व योग्य संधी उपलब्ध व्हावेत यासाठी योग्य असे मार्गदर्शन मिळुन समोर असलेल्या संधीचा फायदा व्हावा यासाठी सहसंचालक व्य.शि.प्र.प्रादेशिक कार्यालय पुणे येथील वाय. पी. पारगावकर भिगवण येथील बिल्ड ग्राफिक्स लिमिटेड कंपनीतील जनरल मॅनेजर व अध्यक्ष आय एम सी आय टी आय इंदापूर चे सोनवणे बी.के.तसेच वॉलमॉंट इंडस्ट्रीज लिमिटेड चे एच आर मॅनेजर चौगुले आर एम तसेच भाग्यलक्ष्मी इंडस्ट्रीज लिमिटेड चे मॅनेजर तथा एच आर रामेश्वर माने हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत
सदर शिबिरास प्रमुख वक्ते म्हणून
१) भतगुणकी काशिनाथ
ड्रीम फाउंडेशन सोलापूर – दहावीनंतर पुढे काय?
२) रामदास पवार
अध्यक्ष पवार चॅरिटेबल ट्रस्ट व पत्रकार दैनिक सकाळ – स्वयंरोजगार
३) डॉक्टर काशिनाथ सोलनकर
प्राध्यापक नागेश्वर विद्यालय भिगवन – करियर मार्गदर्शन
हे वक्ते उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत तरी या सुवर्णसंधीचा दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक
बी. आर. शिंपले, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पुणे, गरदडे डी. एन. प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंदापूर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंदापूर यांनी केले आहे.
शिबिराचे ठिकाण शहा सांस्कृतिक भवन एसटी स्टँड जवळ इंदापूर येथे असून सदर शिबिर सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे.
