दि. ८ जून

बारामती, दि. ७ जून, २०२३ :  महावितरण कंपनीच्या १८ वा वर्धापन दिन बारामती परिमंडलात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महावितरणच्या बारामती, सोलापूर व सातारा मंडल कार्यालयांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांसाठी मंडलनिहाय सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

 

६ जून, २००५ ला तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन होऊन महावितरण कंपनी अस्तित्वात आली. यास यावर्षी १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने दोन वर्षांपासून महावितरणमध्ये स्थापना दिवस अर्थात वर्धापन दिन सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी एकत्र येऊन साजरा करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. बारामती परिमंडलांतर्गत ५ जूनला सातारा मंडलाचा कार्यक्रम झाला. ६ जूनला बारामती मंडलाचा तर ७ जून रोजी सोलापूर मंडल कार्यालयाचा वर्धापन दिन संपन्न झाला. 

 

परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल पावडे यांनी सर्व मंडलाच्या कार्यक्रमांचे उद्धाटन केले. यावेळी बोलताना श्री. पावडे यांनी कंपनीचा १८ वर्षांतील प्रवास सर्वांसमोर मांडला. यादरम्यान आलेल्या आव्हानांना सर्व कर्मचाऱ्यांनी एकदिलाने मात केली. भविष्यात विविध आव्हाने पुढे येणार आहेत. त्या साऱ्यांना तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सज्ज आहेतच. पण त्यांच्या पाठीमागे कुटुंबाची साथही तितकीच महत्वाची असल्याचे ते म्हणाले. 

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातारचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड व त्यांचे सर्व कार्यकारी अभियंते, बारामतीचे प्रभारी अधीक्षक अभियंता गणपत लटपटे व त्यांचे सर्व कार्यकारी अभियंते तसेच सोलापूरच्या कार्यक्रमासाठी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, सर्व कार्यकारी अभियंते, संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमांमुळे अभियंता/अधिकारी-कर्मचारी यांच्यातील संबंध अधिक घट्ट होण्यास मदत झाली आहे. 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *