दि. २२ जून

 

इंदापूर :(दि.२२) जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन आज इंदापूर शहरांमध्ये झाले यावेळी पालखीतळ नजीक बारामती चौक येथे मानव विकास परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या पालखी सोहळ्यातील 2000 वैष्णव भक्तांना चहा ,नाश्ता आणि पाण्याची सोय करुन वैष्णवांची सेवा करण्याचे चांगले सत्कार्य उत्साहात पार पाडले अशी माहिती रेश्मा शेख प्रदेश सचिव यांनी दिली. 

मानव विकास परिषद या सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी संघटनेच्या माध्यमातून लाखो वारकरी आपल्या शहरांमध्ये येत आहेत व अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटना आपापल्या परीने वैष्णवांची सेवा करण्यासाठी पुढे येत असताना आपणही संघटनेच्या माध्यमातून या भाविक भक्तांना चहा नाश्ता व पाणी ही सोय करावी या भावनेने सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम अतिशय उत्साहात पार पाडला अशी माहिती रेश्मा शेख प्रदेश सचिव यांनी दिली. 

 यावेळी प्रदेश सचिव- रेश्मा शेख, प्रदेश संघटक, निलोफर पठाण, पुणे जिल्हा अध्यक्ष, विकास शिंदे, 

पुणे जिल्हा महीला अध्यक्ष,निर्मला जाधव, पुणे जिल्हा सचिव, महीपत कदम, तालुका अध्यक्ष, माधवी सोननिस, तालुका उपाध्यक्ष, मनीषा भांगे, तालुका सल्लागार,Ad रेश्मा गार्डे, तालुका संपर्क प्रमुख, विद्या सरोदे, तालुका मार्गदर्शक, दक्षता ढावरे उपस्थित होते. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *