दि. १६ ऑगस्ट

इंदापूर : भारताने स्वातंत्र्योत्तरच्या 76 वर्षांमध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथिल अंतरिक्ष केंद्रातून महिन्यापूर्वी झालेले चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण या प्रगतीची साक्ष देत आहे, असे गौरवोद्गार पुणे ज़िल्हा परिषदेच्या सदस्या व नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी बावडा येथे मंगळवारी (दि.15) काढले.
बावडा येथील श्री शिवाजी शिक्षण संकुलामध्ये देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अंकिताताई पाटील ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संचलन पथकाकडून त्यांनी मानवंदना स्वीकारली. सदर प्रसंगी अंकिता पाटील ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
अंकिता पाटील ठाकरे पुढे म्हणाल्या, देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशभर दि.13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवली जात आहे. श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे टॅलेंट शोधून त्यांना प्रोत्साहन देण्याचे नियोजन करावे. त्यामुळे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात निश्चितपणे संस्थेचे नाव उंचावतील. संस्थेच्या प्रगतीसाठी कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी परिश्रम घेतले. त्यानंतर हर्षवर्धनजी पाटील हे विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम सुरु करणे, इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत दिसत आहेत.
आज या शिक्षण संस्थेत एकूण 7 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बावडा येथील शिक्षण संकुलामध्ये प्राथमिक पासून पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरवड, बोराटवाडी, रेडा, कुरवली येथेही विद्यालये आहेत. या संस्थेमध्ये शिकलेले बावडा परिसरातील हजारो विद्यार्थी हे सध्या राज्यात व देशभर विविध मोठ्या पदांवरती कार्यरत आहेत, असे गोरोदगारही यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी काढले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेल्या धनंजय गायकवाड (भांडगाव) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या वतीने अंकिता पाटील ठाकरे व मंगला कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्य डी. आर. घोगरे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील, डॉ. लक्ष्मण आसबे, विद्यार्थी संग्राम गायकवाड व अमरसिंग गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे व शिक्षण संस्थेचे संचालक उदयसिंह पाटील, सचिव किरण पाटील, प्रसाद पाटील, स्वप्निल घोगरे, संजय घोगरे, संतोष सूर्यवंशी, विठ्ठल घोगरे या संस्थेच्या संचालकांसह अँड. अनिल पाटील, सुधीर पाटील, अमोल घोगरे, समीर मुलाणी, निलेश घोगरे, पवनराजे घोगरे, सचिन सावंत, अमीर सय्यद, रमेश काकडे, मुनीर आतार, दादासाहेब कांबळे, माजी प्राचार्य पी. एन. गोरे व के. एस.खाडे, ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे, माजी सैनिक, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. टी. मुलाणी यांनी केले. आभार प्राचार्य डी. आर. घोगरे यांनी मानले.
