दि. २२ सप्टेंबर

इंदापूर : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठा गौरीची स्थापना अतिशय मनोभावी केले जाते. या ज्येष्ठा गौरीच्या आगमनाची महिलावर्ग अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात.गौराई ला साडी, नैवेद्य, फराळ, विविध अलंकार व संपूर्णपणे सजावट यासाठी महिला अतिशय कष्ट घेत असतात, व आपल्या गौराईला पाहण्यासाठी व हळदी कुंकवासाठी जास्तीत जास्त महिला याव्यात हा अट्टाहास केला जातो.
इंदापूर शहरात माजी नगराध्यक्षा सुनंदाताई ननवरे यांनी या ज्येष्ठ गौरीची स्थापना व सजावट अतिशय नेत्र दीपक केल्याने इंदापूर शहरातील महिला वर्गात प्रचंड चर्चेचा विषय झाला. ननवरे कुटुंबीय नेहमी कोणताही कार्यक्रम अतिशय मनोभावे करतात त्यामुळे ज्या कार्यक्रमांमध्ये ननवरे कुटुंबियांचा सहभाग असतो त्याची चर्चा इंदापूर शहरांमध्ये नेहमीच होत असते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे अतिशय निष्ठावंत विश्वासू माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे यांच्या घरी या गौरी सजावट पाहण्यासाठी प्रचंड महिलांनी गर्दी केली होती. विठ्ठल (आप्पा) ननवरे हे नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असतात. ननवरे कुटुंबीय हे उद्योग व्यवसायात देखील अनेक वर्षापासून सक्रिय असल्याने त्यांचा तळागाळातील सर्वांशी अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे, त्यामुळेच आज त्यांच्या घरी महिलांची प्रचंड गर्दी व चर्चा झाली.
लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वावरील उतारा म्हणजे ‘ज्येष्ठा गौरी व्रत’ असे मानतात. गौरी पूजनाइतकेच महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे. ज्येष्ठा गौरीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्या वेळी दहीभाताचा नवेद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो.
गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि जेव्हा ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठा गौरी’ असेही म्हणतात.
अशा प्रकारे ज्येष्ठा गौरीची सुंदर आगळी वेगळी सजावट माजी नगराध्यक्षा सौ.सुनंदाताई विठ्ठल ननवरे यांच्या इंदापुर येथील भामाई निवास येथे करण्यात आली.
ही सजावट सौ.मंदाकनी ननवरे,सुनिता ननवरे,सौ.मिना ननवरे,कोमल ननवरे,साधना ननवरे,अमृता ननवरे,वर्षा ननवरे,सिमा ननवरे,अपेक्षा ननवरे,प्रभा ननवरे,सृष्टी ननवरे यांनी केली.
तसेच इंदापूर शहरातील हळदी कुंकासाठी आलेल्या सर्व महिलांनी सजावट पाहुण कौतुक करून आनंद व्यक्त केला.
