दि. ०३ ऑक्टोबर

   राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, पुणे जिल्हा च्या वतीने ” सेवा पंधरवडा” निमित्ताने भिगवण ता. इंदापूर येथील भिगवण महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आज दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३०वा. आयोजन करण्यात आले आहे. 

     या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

    सामाजिक बांधिलकीतून मोठ्या संख्येने युवा वर्ग व नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *