इंदापूर : (दि१८)

इंदापूर येथे आज पार पडलेल्या भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघडीच्या बैठकीत राज्याध्यक्ष बाबुराव काने यांच्या हस्ते पुणे जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाडुळे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व दिव्यांग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाबासाहेब जगताप उपस्थित होते.

बाबासाहेब पाडुळे हे दिव्यांगां च्या हक्कासाठीनेहमी शासन दरबारी आक्रमकपणे काम करतात. त्यांनी आजपर्यंत तहसील कचेरी पंचायत समिती जिल्हा परिषद इत्यादी ठिकाणी दिव्यांगाच्या शासकीय योजनांसाठी आक्रमकपणे खंबीर भूमिका घेऊन दिव्यांगांना शासनाचे लाभ मिळवून दिले आहेत. संपूर्ण पुणे जिल्ह्यात दिव्यांग बांधवांमध्ये त्यांच्या या कामाचे कौतुक होते.

आज पर्यंत त्यांनी दिव्यांगांसाठी केलेल्या कामामुळेच त्यांची आज भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी राजाध्यक्ष बाबुराव काने यांनी निवड केली . नियुक्तीचे पत्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राजाध्यक्ष बाबुराव काने यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक महिला व पुरुष दिव्यांग बांधव उपस्थित होते.

त्यांच्या पुणे जिल्हाध्यक्ष या नियुक्तीमुळे दिव्यांग बांधवांसह समाजातील विविध घटकातील व राजकीय पक्षातील अनेकांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

उपस्थित असणारे इंदापूर शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधव

 

इंदापूर शहर : रहीम शेख, सचिन सुर्यवंशी, राजेंद्र अंकुश, संतोष भोसले, तुषार शेंडे, दिपक आरडे

 

तालुका :- रविंद्र शिंदे, सुनिल चौधरी, राजाराम बारवकर, बापुराव देशमुख, संजय तुपे, रायबा नानेकर, पांडुरंग गायकवाड, अल्ताब सय्यद, संतोष जगताप, शामराव माने, गणेश गायकवाड, पंडीत शषकर, विक्रम जाधव, समीर जाधव, सिद्दीक मुलाणी, केरबा भुजबळ, रघुनाथ शिंदे, नामदेव आवारे, अर्जुन जगताप, दत्तात्रय शिंदे, बबन वाघमोडे, नवनाथ वाघमोडे, चंद्रकांत थोरात, प्रशांत काळे, भिवा तरंगे, मुकुंद कोंडलकर, संतोष गायकवाड, महिपती पाटोळे, अर्जुन जगताप, प्रकाश पारेकर, नाना ढावरे, भगवान मोरे, रविंद्र काळेल, नंदु देवकर, श्यामराव माने, महेश कर्चे, बाळासाहेब सुतार, आप्पा खोमणे (मिस्त्री), भागवत डोंबाळे, सचिन कांबळे, आप्पा कोकरे, रशीद शेख, चंदू कदम, बाळासाहेब कदम, मारुती बंडगर, तानाजी भाकरे

 

महिला इंदापूर तालुका : सौ. शुभांगी लोखंडे, स्वाती बाबर, सुमन हिवरकर, सुनिता लाड, सुशिला पवार, सुरेखा गावडे, माधुरी परदेशी, रत्नमाला पाडुळे, सुरेखा उत्तेकर, मीना सुपेकर, मनिषा शेजाळ, शितल परदेशी, लक्ष्मीबाई धोत्रे, वैशाली भोसले, परी दौंडकर, कुसूम पवार, रुक्मिणी काळे, अंजना तरंगे, उषा गुणवरे, शेजाळ गायकवाड मॅड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *