दिनांक ११ मे

इंदापूर : (दि ११) तालुक्यातील पुर्व भागात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले परंतु उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेल्यांना या अवकाळी पावसाने काहिसा थंडगार गारवा मिळाला.
आज दिवसभर कडक उन्हामुळे हैराण झालेली वयोवृद्ध व्यक्ती, तरूण,शेतकरी, कामगार,शालेय विद्यार्थी, व्यावसायिक व एकुणच समाजातील सर्व घटकांना कडक उन्हामुळे भयंकर त्रास झाला होता.अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल होवून थंडगार गारवा निर्माण झाल्याने समाधान झाले.
आजच्या या अवकाळी पावसामुळे कोणतेही नुकसान झाले नाही.वादळ किंवा वारे नसल्याने किंवा विजांचा कडकडाट नसल्याने ग्रामीण भागातील माणसं आपापल्या घरात बसुन या पावसाचा आनंद घेत होते तर काहीनी थंडगार पावसात मनसोक्त भिजुन आनंद व्यक्त केला .
अचानक सुरु झालेल्या पावसामुळे सर्वांचीच पळापळ झाली. रोडवर वाहणाऱ्या वाहनांनी थोडा वेळ विश्रांती घेतली व चालकांनी पावसाचा आनंद घेतला. शेतकरी वर्ग काहीसा समाधानी झाला.
