दिनांक १२ मे

इंदापूर : (दि१२) मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे म्हणून ओळखले जाणारे संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर शहरात दिनांक १३ मे सोमवारी व दिनांक १४ मे मंगळवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे छत्रपती संभाजी युथ फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रोहित (बंडा) पाटील यांनी सांगितले. 

शंभूराजे म्हणून ओळखले जाणारे संभाजी हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांनी 

१६ जानेवारी १६८१ ते ११ मार्च १६८९ पर्यंत राज्य केले. ते मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ पुत्र होते. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगररांगा पासुन नागपुर पर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रातील खानदेश पासुन ते दक्षिण भारतात तंजावर पर्यंत राज्य केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ला येथे १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांचा मृत्यू ११ मार्च १६८९ रोजी पुणे जिल्ह्यात तुळापूर येथे झाला.

छत्रपती संभाजी महाराज यांनी आयुष्यात एकहि लढाई हरले नाहीत.अशा या लढवय्या राजांच्या जयंतीनिमित्त शहरात छत्रपती युथ फाऊंडेशन च्या वतीने सुरत साडी डेपो कुंभार कॉम्प्लेक्स समोर पंधारा चौक, येथे सोमवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रा वर शिवव्याख्याते श्री.संपत गारगोटे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. व मंगळवारी इंद्रेश्वर चौक,पंधारा, येथुन सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणुक सोहळा हजारो मावळ्यांच्या उपस्थितीत आयोजीत केला आहे तरी आपण उपस्थित रहावे असे आवाहन छत्रपती संभाजी युथ फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रोहित (बंडा) पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *