दिनांक १६ मे

 

 

 

इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम युवक संघटना यांच्या वतीने केतकेश्वर मंगल कार्यालयामध्ये दिनांक 15 मे रोजी मुस्लिम समाजातील बांधवांसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले. या वेळी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांतील 6 मुस्लिम जोडप्यांचा विवाह पार पडला.या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी तालुक्यातून हजारो लोक उपस्थित होते. इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम युवक संघटना यांच्या वतीने या विवाह सोहळयासाठी आलेल्या लोकांना प्रशस्त शामियान्यात स्वतंत्र जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आयोजकांच्या वतीने नवदाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्यवाटप करण्यात आले. या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टचे तालुक्यातील पदाधिकारी, सदस्य व मुस्लिम युवक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवर म्हणाले की, चॅरिटेबल ट्रस्टने व मुस्लिम युवकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. ते अतिशय कौतुकास्पद आहे. तसेच, नववधू-वरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

सामुदायिक विवाह सोहळा ही सध्याच्या परिस्थितीमध्ये काळाची गरज आहे. इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम युवक संघटना यांनी केलेला विवाह सोहळ्याचा उपक्रम चांगला आहे. तालुक्यातील सर्व मुस्लिम युवक एकत्र येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतला. याचा आदर्श सर्व समाजाने घ्यावा असे प्रतिपादन उपस्थित अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. 

यावेळी राजवर्धन पाटील, प्रवीणभैय्या माने, पृथ्वीराज जाचक, भरतशेठ शहा, महारुद्र पाटील, अनिस कुट्टी, मयूरसिंह पाटील, अंकुश जाधव, देवराज जाधव, अविनाश घोलप, कमाल जमादार, शकील सय्यद,गफुर सय्यद, लतीब मुलाणी, सिकंदर मुलाणी, तुषार खराडे, बापू चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर विवाह प्रसंगी माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भ्रमणध्वनी वरून वधू-वरांना तसेच मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *