दिनांक १९ मे

पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनच्या बैठकीमध्ये विविध उपसमित्यांची निवड करण्यात आल्या. यामध्ये प्रसिद्धी समितीच्या सदस्यपदी इंदापूरचे संदीप बल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली.
पुणे येथे महाराष्ट्र खो खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि.19 मे) रोजी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध उपसमित्यांचे गठन करण्यात आले. सदर समितीच्या नियुक्ती या महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी जाहीर केल्या. या सर्व समिती २०२४- २०२८ या कालावधीसाठी कार्यरत असणार आहे.
यामध्ये प्रसिद्ध समितीच्या अध्यक्षपदी सोलापूरचे अजित संगवे तर सचिव पदी रत्नागिरीचे राजेश कळंबटे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून महेश विचारे, भूषण कदम, संदीप बल्लाळ, प्रेमचंद्र चौधरी, दादासाहेब चोरमले, महेश माळवे यांची निवड करण्यात आली.
संदीप बल्लाळ यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र खोखो संघटनेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ऍड. गोविंद शर्मा, सरहसचिव बाळ तोरस्कर यांनी अभिनंदन केले. तर निवडीनंतर संदीप बल्लाळ यांनी मिळालेल्या जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत भविष्यात खेळाला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संदीप बल्लाळ यांच्या निवडीने इंदापुरातील खो-खो क्षेत्रामध्ये मान्यवर व क्रीडाप्रेमींनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
