दिनांक २७ मे 

इंदापूर (दि.२७ ) : दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव तालुका

इंदापूर विद्यालयाचा निकाल ९१.९५% लागला असून यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अध्यक्ष ॲड. रणजीत नामदेवराव बाबर पाटील, सचिव आबासाहेब श्रीमंत काशीद व उपाध्यक्ष बाबुराव ननवरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक व मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले.

         तालुक्यातील कांदलगाव या ठिकाणी दादासाहेब पाटील विद्यालय हे नावाजलेले विद्यालय म्हणून परिचित आहे स्वतः मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचे काटेकोरपणे लक्ष असते त्यामुळे या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली असते. सुसंस्कृत व उच्चशिक्षित पिढी घडविण्यासाठी या विद्यालयाचा नावलौकिक आहे. यंदाच्या वर्षी याच नावलौकिकाला साजेशे असे यश विद्यार्थ्यांनी मिळविल्याबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व मुख्याध्यापकाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष ॲड. रणजीत बाबर, सचिव आबासाहेब श्रीमंत काशीद, उपाध्यक्ष बाबुराव ननवरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *