दिनांक २९ मे

मोहोळ : येत्या ५ जून रोजी पर्यावरण दिनी आमच्या खवणी गावात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड ग्रामस्थांच्या सहकार्याने व जिल्हाधिकारी कुमार अशीर्वाद तसेच आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते करणार आहोत अशी माहिती पर्यावरण प्रेमी अतुल भोसले यांनी दिली .

 

      ‌ सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील खवणी गावात पश्चिम दिशेला असणाऱ्या टेकडीवर येत्या पर्यावरण दिना दिवशीच (५ जून) मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड ग्रामस्थांच्या सहकार्याने व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मनीषा आव्हाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवळेकर, तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक यांच्या शुभहस्ते हे वृक्ष लागवड संपन्न होणार आहे अशी माहिती खवणी गावातील व मोहोळ तालुक्यातील पर्यावरण प्रेमी अतुल भोसले यांनी दिली.

           पर्यावरण प्रेमी अतुल भोसले म्हणाले की प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर अवलंबून न राहता व निसर्गावर देखील अवलंबून न राहता आपलाही सहभाग असावा या स्वच्छ हेतूने येत्या पर्यावरण दिना दिवशीच आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करीत आहोत यासाठी वन खात्याची रीतसर परवानगी घेतली आहे. लोकसंख्येचे वाढते प्रमाण पाहता मिळणारा प्राणवायू आणि त्याचे भविष्यातील दुष्परिणाम लक्षात घेता खवणीतील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन गावाच्या पश्चिम दिशेला वनविभागाच्या आखत्यारितीत असणाऱ्या विस्तीर्ण जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ती झाडे जगविण्याचा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना रितसर परवानगी चे निवेदन सादर केले आहे. यावेळी स्तुत्य अशा उपक्रमाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवून समाधान व्यक्त केले. अशी माहिती पर्यावरण प्रेमी अतुल भोसले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *