राज्यातील खंडकरी शेतकरी हर्षवर्धन पाटील यांना कधीही
विसरणार नाही.. 
तीन पिढ्यांच्या संघर्षाला यश…  हर्षवर्धन पाटलांसारखे नेतृत्व तालुक्याला हवे…. 
          खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवण्यासाठी राज्याचे माजी मंत्री माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी वीस वर्षे सतत खूप मोलाची मदत केली. राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर आधी सात जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न हाती घेऊन तो तत्कालीन महसूल मंत्री  यांच्या सहकार्याने सोडवला. पिढ्यानपिढ्याच्या जमिनी त्यांना परत मिळून देण्यात यश मिळवले. आणि तमाम खंडकरी शेतकर्यांचा  मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न मिटवला. याचे खरेतर सारे श्रेय हर्षवर्धन पाटील यांनाच जाते. ज्या वेळी हा प्रश्न मोठा गुंतागुंतीचा झाला होता त्या वेळी शेतकरी खंडकऱ्यांचा हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मुंबईतील बंगल्यावरती आणि मंत्रालयातील त्यांच्या केबिनमध्ये खंडकरी शेतकरी यांचा सतत राबता असायचा. माननीय हर्षवर्धन पाटील साहेब हे अभ्यासू मंत्री होते. आणि विश्वासू नेते आहेत. खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवण्यासाठी त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. हे ऋण खंडकरी शेतकरी कधीही विसरणार नाही. अशा शब्दात खंडकरी शेतकरी संघटनेचे नेते बी. डी. पाटील  त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचे आभार मानले. 
        वास्तविक हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्यांदा १९९५ मध्ये विधान सभेमध्ये पाउल ठेवले. आणि या तमाम राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला. तत्कालीन सरकार मध्ये पहिल्यांदा अपक्ष्य म्हणून आमदार झाल्या नंतर त्यांनी त्यांच्या आठ अपक्ष आमदारांच्या मदतीने हा प्रश्न विधानसभेत मोठ्या शिताफीने मांडला. खर तर हा प्रश्न मांडल्यावर त्याला लगेचच येश मिळेल, असे कुठे होते. त्यांना त्यासाठी ही मोठा संघर्ष करावा लागला. त्यात विधानसभेतील अनेक मातब्बर मंडळीनी त्यांना विरोध केला. मुळातच या शेतकरी खंडकरी यांना त्यांच्या जमिनी परत देण्यास विरोध झाला. काही सदस्यांनी तर या प्रश्नावर सभात्याग केला. पण पाटील यांनी आपली भूमिका बदलली नाही. की त्यापासून लांब गेले नाहीत. 
 
       महाराष्ट्राच्या इतिहासातील हा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय होता. देशातील ही पहिलीच अशी केस होती. आणि ती सोडवण्यात पाटील यांनी खुबीने प्रयत्न केले. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मालकीची ३७००० हजार एकर जमीन सरकारकडे होती. यात नाशिक पासून ते कोल्हापूर पर्यंत जमिनी सरकारकडे होत्या. पैकी इदापूर तालुक्यातील साडेतीन हजार एकर जमीन आणि माळशिरस तालुक्यातील साडेसात हजार एकर जमीन हि सरकारकडून मिळून दिली. या प्रश्नावर तर काहींनी phd सुद्धा केली आहे. एवढा मोठा आणि गंभीर प्रश्न होता. तो मार्गी लाऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या मागील तीन पिढ्यांना न्याय देण्याचे काम पाटील यांनी केले. 
 
        एवढा मोठा प्रश्न सोडून सुद्धा हर्षवर्धन पाटील प्रसिद्धी पासून लांब राहिले. नाहीतर अलीकडच्या काळात  दर्जाहीन कामाला सुद्धा आय. एस. ओ. नामाकन दर्जा मिळाल्याच्या अविर्भावात भीमगर्जना करून प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न  काही प्रसिद्धीसाठी हफाफलेले नेते करतात. पण माजी मंत्री  पाटील यांनी तसे केले नाही. तर त्यांनी जनतेच्या प्रश्नाल पहिली पसंती दिली, त्यामुळे खंडकरी शेतकरी हर्षवर्धन पाटील यांना कधी ही विसरणार नाही याचमुळे हर्षवर्धन पाटलांसारखे नेतृत्व तालुक्याला हवे ….  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *