भिमसेन उबाळे यांच्या प्रयत्नांना यश इंदापूर गट विकासाधिकारी यांनी दिले बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वीत करणे बाबतचे दिले आदेश.

 

इंदापूर:- विशेष प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ता भिमसेन सर्जेराव उवाळे वालचंदनगर, यांनी दिलेल्या जा.क्र/आस्था2/वशि/1409/2024 इंदापूर दि. 14/08/2024 या उपरोक्त् संदर्भिय विषयान्वये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आपल्याला दिलेल्या वेळात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हजर राहत नसल्याने ग्रामस्थांची ग्रामपंचायतमधील कामे प्रलंबित रहातात. ग्रामसेवक, ग्रार्मावकास अधिकारी ब-याच वेळा ग्रामपंचायत मध्ये भेटत नाही, गावात येत नाही त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते.

 

त्यामुळे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिका-यांना ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक मशिनवर हजेरी सक्तीची करणेबाबत चे पत्र व सदर पत्रावर केलेल्या कार्यवाही बाबत स्मरण पत्रानुसार आपणास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वीत करणे बाबत कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करणे वावत आदेशीत केले आहे .

 

तरी, संदर्भ क्र.1 ते 2 चे तक्रारी अर्ज व संदर्भ क्र.3 नुसार तात्काळ आपले ग्रामपंचायत कार्यालयामध्य बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वीत करावी व ग्रामस्थांचे तक्रारीचे / शंकाचे वेळेत निरसुण करावे असे आज पत्राद्वारे कार्यतत्पर गटविकास श्री सचिन खुडे यांनी स्वातंत्र्याचा पुर्व संधेला आपल्या सहिने पत्राद्वारे सर्व ग्रामसेवक, ग्रार्मावकास अधिकारी यांना वरिल असा आदेश काढून इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थाना सुखद निर्णयाची भेट दिली आहे.

 

गटविकास अधिकारी श्री सचिन खुडे यांच्या या आदेशाने इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातवरण निर्माण झाले असुन आता गावातील ग्रामस्थांची शासकिय कामे ग्रामपंचायत मधिल ग्रामसेवकांच्या उपस्थिती बाबत कोणत्याही अडथळ्याशिवाय त्वरित मार्गी लागतील यासाठी समाधान व्यक्त करुन इंदापूर तालुक्यातून गटविकास अधिकारी यांचे निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *