इंदापूर (दि.१५) : पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थींना सोनई प्रतिष्ठानच्या वतीने मदत केली जाईल असे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती व सोनई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण भैय्या माने यांनी हिंगणगाव येथे पोलीस सेवेत भरती झालेल्या नूतन पोलीस उमेश प्रकाश देवकर, मयुर नानासो माने, ओंकार विजय कांबळे यांच्या नागरी सत्कार समारंभावेळी जाहिर केले.

सविस्तर माहिती अशी की नूतन पोलीस उमेश प्रकाश देवकर (नागपूर शहर) , मयूर नाना माने (अहमदनगर), ओमकार विजय कांबळे (पुणे ग्रामीण) हे बहाद्दर युवक पोलीस सेवेत अतिशय खडतर व कठीण परिश्रम करून पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी आपल्या अनुभव सांगताना आलेल्या अडचणींचा पाढाच वाचला हे ऐकून प्रवीण भैय्या माने यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतावेळी वरील उद्गार काढले पुढे बोलताना ते म्हणाले की आपण पोलीस सेवेत दाखल झाल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन तसेच पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर आई वडील व ज्येष्ठांच्या संस्काराच्या शिदोरीवर आपण प्रामाणिकपणे सेवा कराल अशी आशा बाळगतो. पुढील काळात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थींना योग्य ती मदत सोनाई प्रतिष्ठानच्यावतीने केली जाईल व या राष्ट्राची व देशाची सेवा करण्यासाठी आपण संस्कारक्षम पिढी निर्माण करूया असे उद्गार काढले. नूतन पोलीस उमेश प्रकाश देवकर, मयुर नानासो माने, ओंकार विजय कांबळे यांनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेताना घ्यावयाची काळजी, अभ्यासाचे वेळापत्रक, गोळा फेक, धावणे इत्यादी बाबत अनुभव कथन केला.

 

यावेळी परमेश्वर देवकर, भारत देवकर, दगडू देवकर, अरुण कल्याण देवकर, प्राध्यापक सचिन पाटील , प्रकाश देवकर, अमोल देवकर, विशाल जगताप, कैलास देवकर, दत्ता देवकर, प्रताप देवकर,सचिन देवकर, अजित देवकर, निखील बगाडे, आबा देवकर, शिवाजी अवताडे शिवाजी माने यांच्यासह पालक,तरुण व ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *