इंदापूर : मा. मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगणगाव येथे बाबुळगाव पाटी नजीक देवकर वस्ती (दि २१ ऑगस्ट) भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले असल्याची माहिती विजय (तात्या) देवकर मा. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर यांनी दिली.
सविस्तर माहिती अशी की माजी मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस उद्या (दि.२१ ऑगस्ट) संपूर्ण तालुकाभर आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हीतचिंतक वेगवेगळ्या उपक्रमाने दरवर्षी करीत असतात व आपल्या नेतृत्वावरील विश्वास दृढ करीत असतात व त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे आशि सदिच्छा मनोमन व्यक्त करीत असतात. उद्याही होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विजय (तात्या) देवकर व मित्र परिवाराच्या वतीने हिंगणगाव (बाभुळगाव पाटी) नजीक देवकर वस्ती येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक विजय (तात्या) देवकर यांनी दिली.
या शिबिराचा लाभ तरुण व रक्तदात्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
