संपादकीय

दि २३ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदारांच्या ५ कोटी पेक्षा जास्त नीधी आणल्याचा कामांचा गुणगौरव करताना राहिलेली कामे करण्याची आमच्यात आहे (अजितदादा पवार आणि दत्तात्रय भरणे) पुढे आसा नीधी आणू किंवा तसंच काहीसं बोलताना अप्रत्यक्ष रीत्या दत्तात्रय भरणे यांना एकप्रकारे विधानसभेसाठी लाईन क्लिअर करून टाकली..!

 

सध्या इंदापुर तालुक्याचं वातावरण वेगळ्या वळणावर आहे, लोकांचा मुड बदलल्याचं चित्र दिसत आहे…! त्यातच प्रमुख पक्षातील पदाधिकाऱ्यांची आमदारकी वरून चढाओढ सुरू आहे.. “मला नाही तर तुला पण नाही” असंच काहीसं चित्र दिसून येत आहे. याचीच परिणती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (घड्याळ) दिसून येत आहे. कमीतकमी राज्यपाल नियुक्त आमदारकी तरी पदरात पाडून घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कार्यकर्त्यांकरवी संपूर्ण इंदापुर तालुक्यात छुपके छुपके गाटी-भेटी दौरा केला यावरून पक्षात सर्व काही सुरळीत आहे असं वाटत नाही… जर गारटकरांना राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळाली नाही तर….! इंदापुरच्या राजकीय आखाड्यात नवा ट्विस्ट पहायला मिळेल असा कयास देखील राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

 

हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोधात ठाकणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने २०१९ च्या विधानसभेला अंदाजे एक लाख पंधरा/ वीस हजारांच्या आसपास मतं मिळवून निसटता विजय मिळवला होता, हे सर्वश्रुत आहे.. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कडे एक लाख वीस हजार मतांचा आकडा होता असं गृहीत धरलं …! तर आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फाटाफूट झाली म्हणजे त्या एक लाख वीस हजार मतांची विभागणी होऊन अंदाजे साठ-साठ हजार मतांचा आकडा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कडे आहे… त्यात राष्ट्रवादी (तुतारी) पक्ष साठ हजार आणि राष्ट्रवादी (घड्याळ) पक्ष साठ हजार मतं…! जर राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांना राज्यपाल नियुक्त आमदारकी नाही मिळाली तर..! त्या साठ हजार मतांमधून कमीतकमी वीस हजार मतांची घट होईल..! असं राजकीय जाणकार सांगतात… म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी (घड्याळ) पक्ष किती नंबरला जाणार..? आणि राष्ट्रवादी (तुतारी) पक्ष किती नंबरवर राहील…. हे देखील पहाणे औत्सुक्याचे ठरेल

 

हर्षवर्धन पाटील यांच्या मतांचा विचार केला तर.. पाटील यांनी २०१९ च्या विधानसभेला भाजप कडून निवडणूक लढविली होती, त्यावेळी त्यांना अंदाजे एक लाख दहा हजारांच्या आसपास मतं मिळाली होती… तसा विचार केला तर इंदापुरात भाजप पक्षाला वैयक्तिक मानणाऱ्या मतदारांची संख्या पाच ते दहा हजार मतांच्या आसपास असेल असं राजकीय जाणकार सांगतात.. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटलांनी भाजपमधून निवडणूक लढवल्या मुळं हर्षवर्धन पाटलांची साथ सोडलेल्या मतदारांची संख्या देखील तेवढ्याच प्रमाणात आहे… हे देखील ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे. …..म्हणजे हर्षवर्धन पाटील हे भाजप कडून निवडणूक लढो आथवा अपक्ष लढो त्यांच्याकडे एक लाख दहा हजार मतांचा फिक्स आकडा आहे… ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांची जमेची बाजू आहे.

 

इंदापुर विधानसभेत राष्ट्रवादी (घड्याळ) विरूद्ध राष्ट्रवादी (तुतारी) विरूद्ध भाजप बंडखोर/अपक्ष हर्षवर्धन पाटील हेच प्रमुख पक्ष एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे ठाकणार यात शंका नाही…

( महत्त्वाची टीप: – राष्ट्रवादी (तुतारी) विरूद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (घड्याळ) बंडखोर/अपक्ष दत्तात्रय भरणे अशी पण लढत होऊ शकते)

 

येणाऱ्या २०२४ च्या विधानसभेत निवडून येणाऱ्या उमेदवाराला फक्त ऐंशी ते नव्वद हजार मतांच्या आकड्याची गरज असेल, तो आकडा हर्षवर्धन पाटलांनी भाजपकडून निवडणूक लढवू आथवा अपक्ष लढवू त्यांच्या कडे आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत हर्षवर्धन पाटलांचा विजयी मार्ग सुकर असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *