इंदापुर (दि.३०) : शहरात गजबजलेल्या व वर्दळीच्या ठिकाणी इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर एका तीस वर्षे युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून यामुळे इंदापूर शहर हादरले असून संपूर्ण शहरांमध्ये एक प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे
आज (सोमवार )सायंकाळी अंदाजे सात वाजताच्या सुमारास अज्ञातांनी तीस वर्षीय युवकावर गोळीबार केल्याने कॉलेज परिसरात व इंदापूर शहरात तणावाचे वातावरण पसरले असून इंदापूर शहर हादरले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून जखमी युवकाला इंदापूर शहरातील नामांकित यशोदीप हॉस्पिटल आणि यशदा स्किन केअर क्लिनिक, डॉक्टर पानबुडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून जखमी युवकावर तातडीने उपचार चालू आहेत.
गेल्या काही दिवसात तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून इंदापूर सावरले असताना पुन्हा एकदा झालेल्या गोळीबाराने ऐन निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील वातावरण गरम होण्याची चिन्ह आहेत
