दि. १५ ऑक्टोबर

विशाखापट्टणम हून बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी नेण्यात येत असलेला ५४ लाख ५५हजार रुपयांचा २१८किलो २०० ग्रॅम गांजा व गुन्ह्यात वापरण्यात आलेली २६ लाख रुपये किमतीची तीन चार चाकी वाहने असा ८० लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल शुक्रवारी (दि.१४ ) जप्त करण्यात आला. पाच जणाविरुद्ध एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.

अमीर गुलाब मुलानी राहणार मळद तालुका बारामती, प्रकाश राजेंद्र हळदे राहणार सातव शाळेजवळ बारामती, मूळ राहणार मुकई एसटी स्टँड जवळ तालुका शिरूर, खंडू अश्रू परखड राहणार पाहुणेवाडी तालुका बारामती, मूळ राहणार लोणीपारवड वस्ती तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर, रोहन उर्फ फलिशिंग काशिनाथ जगताप राहणार देसाई इस्टेट क्रीडा संकुल मागे बारामती मूळ राहणार पंढरी सावता माळी मंदिराजवळ तालुका बारामती, सुरज भगवान कोकरे राहणार हनुमंत वाडी तालुका बारामती यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे..

आरोपी टाटा कंपनीच्या हॅरिहर कार मध्ये  अमली पदार्थ घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सरडेवाडी गावच्या हद्दीत सापळा लावला होता. तपासणीमध्ये शुक्रवारी पहाटे एफ आय २० कार व त्याच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची हॅरिहर कार जात असताना पोलिसांना आढळली. तिला थांबण्याचा प्रयत्न केला असता, हॅरिहर कार  न थांबता पुणे बाजूकडे गेली. पोलिसांनी तिचा पाठलाग करत निमगाव केतकी गावच्या हद्दीत सोनाई डेअरी जवळ ताब्यात घेतली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता,कारचा डीकी मध्ये व मधल्या सिट खाली खाकी रंगाच्या चिकटपट्टीच्या आवरणातील पाकिटे दिसली.

सदर कारवाई डॉ. अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण,  मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग ,गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग,अशोक शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सपोनी पोलीस  प्रकाश पवार, सोपोनी  ज्ञानेश्वर धनवे,  सोपोनी  महेश माने,सपोनी दाजी देठे, पो स ई पाडुळे, पोसई गणेश जगदाळे (LCB) ,पोसई अमित सिद पाटील (LCB),सहा. फौजदार बाळासाहेब कारंडे (LCB) ,सहा. फौजदार काशिनाथ राजापुरे (LCB), पो हवालदार ए डी एकशिंगे (LCB) ,पो. हवालदार एस एम अहिवळे (LCB), पो. हवालदार शेळके, पो हवालदार मोमीन (LCB) ,पो. ना एम एन थिगळे (LCB), सहा. फौजदार सतीश ढवळे ,सहा फौजदार युवराज कदम,  पो ना बापु मोहिते , पो ना सलमान खान, पो शि  काळे, पो शि राखुंडे, पो शि विशाल चौधर,  पो शि  सूर्यवंशी यांनी कारवाई केली

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *