दि. १७ ऑक्टोबर

गेले एक महिना गाजत असलेले सरडेवाडी तालुका इंदापूर टोल नाका तोडफोड आंदोलन येत्या २७ ऑक्टोबर रोजीच करणार असा ठाम निर्धार रिपब्लिकन नेते संजयभैय्या सोनवणे यांनी (दि.१७ ऑक्टोबर ) जाहीर केला.
सरडेवाडी टोल नाका तोडफोड आंदोलन होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर पोलीस निरीक्षक इंदापूर व तहसीलदार इंदापूर यांनी आंदोलन व टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यासमवेत बैठका घेऊन आटोकट प्रयत्न केले, परंतु टोल प्रशासनातील अधिकारी मगरूर आहेत,त्यांना फक्त पैसा हवा आहे,वाहनधारकाबरोबरच स्थानिकांचे यांना काही देणेघाने नाही असा गंभीर आरोप संजय भैय्या सोनवणे यांनी केला.
पुढे बोलताना संजय भैया सोनवणे म्हणाले की आम्ही आज दिनांक १७ ऑक्टोबर रोजी स्थानिक रहिवासी वाहनधारकांंसह तहसीलदार इंदापूर यांना २७ ऑक्टोबर रोजी सरडेवाडी टोल नाका तोडफोड आंदोलन करणार आहोत अशा आशयाचे निवेदन दिले असून, आमच्या मागण्या वास्तविक पाहता त्यांनी पूर्ण कराव्यात हे सांगणे बरोबर नसून त्यांच्या नियमावलीतच तसे नमूद केले आहे. प्रवाशांच्या जीविताचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. तसेच आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन सहकार्याची भूमिका घेतली होती परंतु स्थानिकांच्या बाबतीत सहकार्य न करण्याची घेतलेल्या टोल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ स्थानिक गावच्या नागरिकांना सोबत घेऊन सरडेवाडी टोल नाका तोडफोड आंदोलन करणारच. आमच्या मागण्यांचा पाच दिवसात विचार न केल्यास हे आंदोलन होणारच असे जाहीर केले.

*आंदोलकाच्या मागण्या खालील प्रमाणे*
१) टोल नाका परिसरातील स्थानिक युवकांच्या चहाच्या स्टॉल वरील कारवाई ताबडतोब थांबविण्यात यावी
२) टोल पासून २० किलोमीटर अंतरावरील स्थानिक सर्व वाहनांना टोलमुक्त करण्यात यावे
३) टोलवर सानिकी लोकांना प्राधान्याने नोकरी द्यावी बाहेरच्या कामगारामुळे अनेक अडचणी होत आहेत टोलमध्ये स्थानिक नागरिकांसाठी जाणण्यासाठी एक लेन सोडण्यात यावी कामगार वाढविणे
४) गोकुळ हॉटेल हिंगणगाव तसेच इतर ब्लॅक स्पोट ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर किंवा पर्यायी व्यवस्था करावी
५) टोल हद्दीतील सर्व मेन रोड तसेच सर्विस रोडचे डांबरीकरण करण्यात यावे तसेच सर्व गटारी स्वच्छ करण्यात याव्यात झाडाची कटिंग वेळेत करावी
६) हिंगणगाव मधील शौचालय सुरू करून त्या ठिकाणी सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात
७) टोल हद्दीमध्ये अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना तात्काळ सुविधा मिळाव्यात
८) टोल नाक्यावरील सर्व कर्मचारी पात्रता तपासणी
९) अपघात घडल्यानंतर प्राथमिक उपचार मिळण्यासाठी टोल प्लाजा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र करणे फायर ब्रिगेड वाढविणे ॲम्बुलन्स वाढविणे
१०) टोल हद्दीमध्ये टोलच्या चुकीच्या नियोजनामुळे अपघात झाल्यास त्या गुन्ह्यात टोल प्रशासनाला आरोपी करावे
दरम्यान निवेदन दिल्यानंतर बोलताना संजय भैया सोनवणे यांनी टोल वरील कर्मचारी गुन्हेगारी वृत्तीचे असल्याचा गंभीर आरोप केला. अपघातानंतर टोल कर्मचारी चोरी करतात असाही आरोप केला. हि भ्रष्ट यंत्रणा असल्याचे ठणकावून सांगितले. या भ्रष्ट यंत्रणेवर NHAI चा कसलाही अंकुश दिसून येत नाही. टोल प्रशासनाकडून संबंधितांना हप्ते दिले जातात याचा त्रास स्थानिकांना होत आहे,तसेच आंदोलकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवली जात आहे परंतु आम्ही आंदोलन करणारच असा ठाम निर्धार संजयभैय्या सोनवणे यांनी केला आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, तहसीलदार इंदापूर ,पोलीस निरीक्षक इंदापूर यांना देण्यात आल्या आहेत.
